शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्याच्या संदर्भात नागपूर विधानसभेवरील मोर्चास प्रतिसाद ; प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित खालील मागण्याकरीता अखिल महाराष्ट्र उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे अंतर्गत विदर्भ / मराठवाडा / प. महाराष्ट्र मुख्याध्यापक / शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय आघाडी चे वतीने  दि. २७ डिसेंबर २०२२ ला विधान भवना अधिवेशन येथे धरणे व मोर्चा काढण्यात आला अशी माहिती प्राचार्य तथा समन्वय आघाडी सचिव मोतीराम केंद्रे  यांनी दिली.

  प्रलंबीत असलेल्या मागण्या मान्य  कराव्यात यासाठी उपोषण पुकारण्यात आले .

१. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे…

२. १ नोव्हेंबर २००५ ला किंवा त्यानंतर नियुक्त शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ३. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये नियमीत वेतनेत्तर अनुदान मंजुर करून देय करण्यात यावे.

प्रत्येक वर्षात वेतनेत्तर अनुदान देण्यात यावे. तसेच वेतनेत्तर अनुदान पुर्ववत – MEPS Rule / माध्य .संहितानुसार देण्यात यावे.

४. माध्यमिक शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रिक्त पदांवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करण्यात यावी.

५. विनाअनुदानीत / अंशतः / त्रुटीपुर्तता केलेल्या शाळा/तुकड्यांना प्रचलित नियमानुसार  अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा.

६. सातवे वेतन आयोग खंड-२ प्रकाशित करणेबाबत शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा.

७. कोविड- १९ काळातील प्रभावामुळे मृत/आजारी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वैद्यकीय प्र व इतर देयके तातडीने मंजुर करण्यात यावी. तसेच कोविड पश्चात होणारे आजार वैद्यकीय प्र तात्काळ मंजूर करण्यात यावे.

स्वतंत्र शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा. सिव्हील सर्जन नी देवके व खाजगी डॉक्टरांकडून उपचार वैद्यकिय प्रतिपूर्ती देयके मंजूर करण्यात यावे.

८. केंद्रीय सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुविधांची रक्कम (लाभ) मिळण्यात  ,९ )शाळांच्या संच मान्यता करीता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सक्ती करण्यात येवू नये.

१०. सेवा अधिनियम कायद्या अंतर्गत शिक्षण विभागात प्रलंबीत असणारे शिक्षकांच्या प्रकरणाबाबत कठोर कार्यवाही व नियोजन होण्याकरीता शिक्षक समन्वय समिती गठीत करण्यात यावी. ११. अंशत अनुदानित शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांना बारा वर्ष / चोवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा.

१२. आदिवासी आश्रमशाळा No Work: No Pay अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबतचा शासन निर्णय रद करण्यात यावा व त्या काळातील वेतन अदा करण्यात यावे. आदिवासी उपाययोजन क्षेत्र (TSP-1901) या हेड अंतर्गत शिक्षक कर्मचारी यांचे नियमीत वेतन अदा करणेबाबत

१३. समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी हे जवळपास २० वर्षापासून करार पध्दतीवर अगदी अन्य

मानधनावर काम करीत आहेत. या सर्व कर्मचारी यांच्या सेवा नियमित करून त्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे

वेतनश्रेणी लागू करून शासकीय सेवेचे सर्व सोई सुविधा लागू करण्यात याव्यात,

१४, कायम विनाअनुदानीत शाळांना CBSE/ICSE शाळांतील शिक्षक/कर्मचारी यांना सेवासंरक्षण व विमा कवच शासनाकडून मिळण्यात यावे.

१५. शालेय शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये. १६. नक्षलवादी जिल्ह्यातील शिक्षकांना सर्व कार्यरत कर्मचान्यांना पुढील टप्पा वेतन श्रेणी (One Step

Promotion) देण्यात यावी. १७. पाच वर्षापासून प्रलंबीत असलेले शिक्षण सेवक मानधन मेडीकल बिले व जीपीएफ परतावा, अंश राशीकरण

अजीत रजा रोखीकरण व इतर देयके तात्काळ मंजूर करण्यात यावे. १८. ग्रामीण शालेय इमारतीप्रमाणे शहरी शालेय इमारतीना पर टैक्स माफ करण्यात यावा.

१९. खाजगी अनुदानीत / अंशतः अनुदानीत माध्यमिक शाळांचे नियमीत विज देयके (Electing Bin) घरगुती विज देयकाप्रमाणे करण्यात यावे.

२०. नगर परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी याना (NPS) राष्ट्रिय सेवानिवृत्ती योजना

आणि कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी.

२१. नगर परिषद शाळा तथा अनुदानीत माध्यमिक शाळेतील पी. एच. डी. धारक शिक्षकांना पदोन्नती आणि ज्यादा वेतनवाढ मंजूर करण्यात यावी.

२२. संचमान्यता तयार करण्यात यावी.

या निवेदनावर रावसाहेब आवारी संस्थापक अध्यक्ष ,
मारोती खेडेकर राज्य मार्गदर्शक ,मोहन सोनवणे पाटील ,ज्ञानेश्वर मलाई संयोजक ,वसंत पाटील मार्गदर्शक ,विलास भारसाकळे कोषाध्यक्ष ,
ममता गवळी महिला प्रतिनिधी ,शत्रुघ्न बिरक उपाध्यक्ष ,मोतीराम केंद्रे सचिव ,मिलींद सालोडकर अध्यक्ष , जुनीनजना केरूभाऊ दोमसे आध्यक्ष
विदर्भ सचिव (मुख्य सरपोलक ,अशोक पारधी कार्याध्यक्ष ,प्रकाश देशमुख
,प्रदिप गोमासे विदर्भ प्रतिनिधी ,सुनिल कुवार ,
मंदा उमाठे उपाध्यक्ष, विदर्भ ,डी. आर. पटले आदिच्या स्वाक्षर्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *