काल घरी गाजर हलवा बनत होता.. बनत होता म्हणजे मी पाव काम केलं पाऊण सचिनने केलं.. आता बाजारात गाजरं मस्त आलेत आणि मुलगी , सासरे आले हे निमित्त.. हलवा करत असताना सासरे म्हणाले , तुला येत नाही का गं हलवा ?? .. मी म्हटलं , अहो बाबा We are Mad for each other and Made for each other too…so No need Maid … बाबा म्हणाले , गावाकडची साधी मुलगी म्हणून मी सचिन ला म्हटलं कर हिच्याशी लग्न आणि आता मलाच काही कळेना माझा मुलगा मॅड आहे / मेड आहे किवा हिच्यासाठी बनलाय..घरात सगळेच पुढे पाच मिनीटे हसत होतो.. असं आमच्याकडे काहीना काही कायम सुरु असतं.. सगळे स्पोर्टींगली घेतो आणि मॅडनेस जपत कधी मेड होवुन जगतो तर कधी मेड फॉर इच अदर म्हणत कधी गाजर हलवा तर कधी कारल्याची भाजी करतो.. घरात हवा हलव्याचा गोडवा तर कधी मेथीचा कडवटपणा , आवळ्याचा तुरटपणा तर चिंचेचा आंबटपणा आणि माझ्यासारखी झणझणीत मिरची हवीच त्यावर लसणाचा झणझणीत तडका त्यामुळे Mad / Maid / made हा प्रश्नच उरत नाही… घरातील प्रत्येक काम प्रत्येकजण करतो .. मुलगा / मुलगी भेदभाव न करता मुलाला सगळं शिकवलं तर आयता गाजर हलवा हातात मिळतो …. मस्त हसा.. मजेत रहा..
२०२२ संपत आलय .. नवीन वर्षांचे स्वागत हलव्याने करुयात..