भीक कोण मागते ..?

 

चाळीस पन्नास वर्षापूर्वी आजच्यासारखी भरमसाठ वाहनं नव्हती कि प्रवासाची साधनं फारसं नव्हती.मोठमोठया शहरांना जोडणारे रस्ते असतील पण खेडेगाव त्याकाळी भकास होते.खेडूत पाऊलवाटेने प्रवास करित.त्या पाऊल वाटेलाच ते धोपट रस्ता म्हणायचे.पूर्वीची माणसं रस्त्याबाबत फारसी चर्चा करत नसत.जसं रस्त्याचं तसचं समाज माध्यमाचे. गावात एखाद्या श्रीमंत असामीकडे रेडीओ असायचा किंवा ग्रामपंचायतमध्ये असायचा.पण त्याकाळी फारसे खेडूत माणसं बातम्या ऐकायचे नाही.ऐकले तरी बातमी कसलीही असो फारसे गांभिर्याने घेत नसत. चर्चाही करत नसत ते आपआपल्या कामात दंग असत.

 

 

 

आजच्यासारखी टवाळखोर माणसं खेडयात फार कमी होती.खेडेगावातून जसं धोतरची जागा विजारने घेतली पुढे विजारची जागा जिन्स पॅन्टेन घेतली व जिन्सची जागा बुर्मडाने घेतली तसं खेडेगावच चेहराही बदलत गेलं.शहरं तर चांगल्या वाईट रितीरिवाजाने टम्म फुगू लागली.आज जग अधुनिक बनलं आहे.अधुनिक युगात कोणतीही गोष्ट शहरापासून खेडेगावापर्यंत व खेडेगावापासून शहरापर्यंत क्षणात पोहचते.लहानातीत लहान व मोठ्यातील मोठी घटना घडली तर ती तात्काळ चोहिकडे पोहचते त्यास आजीबात वेळ लागत नाही.व त्या घटनेविषयीच्या क्रिया प्रतिक्रीया समाजात ताबडतोब उमटतात.

 

 

 

 

पूर्वी जे काही बोललं जायचं ते त्या भागापूर्तचं सिमीत राहायचं;पण आज चांगलं बोलले तरी समाजात प्रतिक्रिया उमटतात मग वाईट बोललं असं समाज माध्यमानं सांगितलं की समाजात आगडोंब उसळते.सामान्य माणुस बोललं तर फारशा प्रतिक्रीया उमटत नाही;पण जेव्हा समाजात प्रतिष्ठा पावलेला माणुस किंवा नेता किंवा समाजसेवक काहीतरीच बोलून जातो तेव्हा समाजात आग लागल्याशिवाय राहत नाही.

 

 

 

 

 

आजकाल तर कोण किती बोलतो? कसा बोलतो?व थोर पुरुषांची बदनामी कोण कशी करतो याची चढाओढ लागलेली दिसते.सध्याला समाज ज्याना दैवत मानते अराध्य दैवत मानते,ज्यांना आदर्श मानते त्या आदर्श पुरूषाविषयी ,स्त्रियांनविषयी काहीतरी चुकीचं बोलून विविध समाजातील लोकाचं मन दुःखवण्याचे कलुषित करण्याचे कार्य समाजातील पुढारी लोक करताना दिसतात.आता ते मुद्दाम बोलतात का चुकून शब्द तोंडाबाहेर पडतात हे फक्त तेच बोलणारेच सांगू शकतात.

समाजातील या नेत्यांना एक वाईट सवय आहे ती सवय आहे प्रसिद्धीची.स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते तसे बोलत असावेत.इतिहासातील आदर्श व्यक्तीविषयी बोलण्याची घाणेरडी सवय आजकालच्या नेत्याना जडली आहे.

छ.शिवाजी महाराज , महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बरचं काही समाजमनाला न पटनारे बोलले गेले.कोणी सांगितलं छ. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणमध्ये झालं.कोणी एक म्हणाले महात्मा फुले, महामानव डॉ.आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागून शाळा चालवली.आता विचार करा भिक म्हणजे काय?आहो भिक या शब्दांचा अर्थ लाचार होतो.जो स्वतःच्या स्वार्थासाठी, पोटासाठी मागतो ते भीक. लाचारीने दुसऱ्या समोर हात पसरुन मागणे म्हणजे भीक. या थोर पुरुषांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काय मागीतलय? कोणाकडे मागीतलय? त्यांनी असे काही केलय का ते सांगा.त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणासमोर हात पसरले का? भीक मागणारे लाचार आजच्या समाजात आपणास भाराभर सापडतील.

एकदा एक परदेशातीत मोठा व्यक्ती बहुधा तो अमेरिकेतून आला होता. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटालांना विचारलं मी तुमच्या कार्यासाठी शैक्षणिक कामासाठी काही मदत करू इच्छितो.माझ्याकडून तुमच्या कामासाठी काही दान देवू इच्छितो तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील ताडकन म्हणाले”तुमच्या मदतीची मला गरज नाही”त्यांनी रस्त्याच्या बाजूला फोडलेल्या खडीकडे बोट करून म्हणाले, “I don’t need your help.These are my dollers.”

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सिनेमातील प्रसिद्ध कलाकार दिलीपकुमार यांनीही त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी काही दान घेण्यासाठी विचारले ;पण डॉ. बाबासाहेबांनी त्यांची मदत स्विकारली नाही. यावरून हेच दिसून येते की हे थोर पुरुष मानी होते.त्यांनी त्याचं स्वाभिमान कोणाकडे कधीही गहान ठेवले नाही,कोणा समोर लाचारीने मान झुकविले नाही.कोणापुढे लाचारी पत्करली नाही.स्वाभिमानाने ते समाजात वावरले व समाजाला स्वाभिमानाने जगण्यास शिकवले.

मग या महान विभुती भिक कोणासाठी मागितलं? या महान विभुतीनी भीक मागितली असं कसं म्हणतात आपले पुढारी.होय जरुर यांनी निःस्वार्थपणे दान करणाऱ्या लोकांकडून दान स्विकारले असतील मग ते दान म्हणजे भीक नव्हे.जेव्हा मिळालेली दान दुसऱ्याच्या हितासाठी दुसऱ्यांच्या भल्यासाठी निस्वार्थपणे वापरली जाते त्यास दान म्हातात.दान घेण्याऱ्याचं व दान देणाऱ्याचं यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ दडलेला नसतो. मग या दानाला कोणी भीक म्हणत असेल तर त्यांचा बुध्दीची कीव येते.दान व भीक यातील फरक जाणून घ्या व नंतरच विधान करा.

थोर पुरुष्यांचा अपमान करण्याची आजकाल जनुकाही होड प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये लागली आहे.तशीच होड प्रत्येक नेत्याना दुसऱ्या नेत्यांनी बोललेल्या शब्दाचां अर्थाचा अनार्थ करण्यात ही लागलेली दिसून येते.विधानसभेत एका नेत्याने मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.अंडी खा पण कोंबडी जिवंत ठेवा असं काहीतरी विधान केलं.त्यावर लगेच दुसऱ्या बाजूचे एक आमदार म्हणाले कोंबडी म्हणून तुम्ही मुंबईकरांचं आपमान केलय.मुंबईकर कोंबडया आहेत का?आता बोला काय बोलणार समोरचा व्यक्ती. भारताला पूर्वी सोनेकी चिडीया म्हणायचे आता आपण असे म्हणावे का असाही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतोय.

आता तुम्ही कसंही बोला राव विरोधी किंवा सत्ताधारी बाकावरील व्यक्ति समोरच्यास चुकीच बोललं असं म्हणणारच.आता लक्षात ठेवा म्हणी किंवा वाक्प्रचाराचा वापर करताना काळजी घ्यावी लागेल.मी नाही त्यातली कडी लावा आतली. ही म्हण खेडेगावातील सरास बाई व पुरुष वापरताना दिसतात.पण आता थोडं सांभाळून व जपून वापरवं लागेल.तसेच कोल्हा काकडीला राजी.आशा म्हणी वापरतानाही आता काळजी घ्यावी लागणार आहे.पहिली म्हण स्त्रियांचा अपमान करणारी आहे असे आरोप होऊ शकते तर दुसरी व्यक्ती म्हणू शकते आम्हाला कोल्हयाची उपाधी दिली का ?यामुळे माझं अपमान झालं. आशा कितीतरी म्हणी वाक्प्रचार आहेत ते शाळेत गुरुजीनी ही मुलांना मुलीना जपून तोलून मापून शिकवावे लागेल , सांगावे लागेल.

या काळात या युगात वावरताना,बोलताना प्रत्येकांनी काळजी घेतलीच पाहिजे. निसर्गाने मानवाला अवयव देताना काही अवयव दोन दिलेले आहेत.तर काही अवयव एकच आहे.ते एक अवयव जपून वापरायला निसर्गाने आपल्याला सांगितलेलं आहे.आपल्याला निसर्गाने एकच जीभ दिलेली आहे.जीभ नासली की समाज जवळ करणार नाही.जीभीच वापर योग्य करू या.म्हणून बोलताना विचार करून बोला.बोलून विचारात पडू नका.

 

 

राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *