कंधार (प्रतिनिधी )
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना शिक्षणाचे दालने खुली करून दिली म्हणूनच या समाजत स्त्री सन्मानाने जीवन जगत आहे त्यांचे हे आदर्श कार्य भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ.राजश्री शिंदे या होत्या तर सौ मीरा क्षीरसागर, सौ. श्यामा पाटील, सौ.मनीषा कुरुडे, आधी सह विध्यार्थीनि ची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील मुलींना शालेय साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना सौ. वर्षाताई म्हणाल्या की ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते त्यांना शिक्षणाचे अधिकार, सामाजिक अधिकार नव्हते समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या अंगावर दगड माती, शेण झेलून स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडून त्या स्वतः पहिल्या महिला शिक्षिका झाल्या त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षणाचे दालने खुली करून दिले त्यामुळे समाजात स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे पुरुषाचे बरोबरीने स्त्रिया प्रतेक क्षेत्रात काम करत आहेत स्त्रियाना त्यांचे सर्व हक्क मिळाले हे सर्व सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे घडले, त्यांचा कार्याचा व विचाराचा वारसा भविष्यामध्ये मुलींनी चालवावा म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांची योगदान भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.
याप्रसंगी सौ.वर्षाताई यांनी असे आवाहन केले की पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांची प्रगती घडून आणावी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा कुरुडे यांनी केले.