राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.बदलत्या काळात वाचन संस्कृती आता कमी होत चालली आहे हे धोकादायक आहे. मोबाईलमुळे वाचना पासून आपण दूर जात आहोत अशी भीती व्यक्त करत शिवश्री रमेश पवार यांनी पुस्तक हेच मस्तक घडवू शकतात असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयात सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव महाराष्ट्राच्या लेकीचा गौरव कर्तृत्ववान मातेचा हा कार्यक्रम राबविण्यात येतो गेल्या सात वर्षा पासून संस्थापक वसंतराव पवार यांच्या संकल्पनेतून जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिजाऊ महोत्सव साजरा करण्यात येत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बहि:शाल शिक्षण केंद्राचे वक्ते शिवश्री रमेश पवार यांनी जिजाऊ जन्मोत्सव महोत्सव २०२३ मध्ये दुसरे पुष्प गुंफले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे होते प्रमुख पाहुणे जिजामाता शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार, डॉ याउप्रा शाळेचे मुख्याध्यापक सुल्तानखान , सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण यांनी उपस्थिती होती.
व्याख्याते रमेश पवार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देताना आजच्या बदलत्या काळात महिलांच्या समोर मोठे आव्हान आहे.पुस्तक मस्तक घडविते .विद्ववता घडते लेखणी मुळे जीवन समृद्ध होते.असा उपदेश विद्यार्थ्यांना रमेश पवार यांनी केला. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केले सात वर्षा पासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा करताना राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती श्री वडजे यांनी दिली
प्रास्ताविक एच जी पवार यांनी केले तर प्रमुख वक्ते यांचा परिचय आर आर पिठ्ठलवाड यांनी केला दिलीप काहलेकर, शेख शब्बीर, एस ई पवार, व्ही एस गुद्धे, आर आर पारेकर, एस आर शेटे, श्रीमती आढाव, सौ मीना काळकेकर , फेरोजखान, अहमद अखिल , निखत बेगम, शेख फतरु , विठ्ठल वडजे, व्यंकट पवार,श्रीमती शेडगे, श्रीमती खरात यावेळी उपस्थित होते.