दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान चे पत्रकार पुरस्कार जाहीर…. विलास आठवले यांना राज्यस्तरीय , रवींद्र तहकीक यांना मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार तर अभिनेता सयाजी शिंदे यांना सामाजिक पुरस्कार जाहीर

कंधार प्रतिनिधी

हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापण दिनाचे औचित्य साधुन कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण च्या वतिने गेल्या ४ वर्षापासून पत्रकारांना पुरस्कार देवून गौरव केला जातो . २०२२ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले . त्यामध्ये न्यूज स्टेट महाराष्ट्र टिव्ही चॅनलचे उपसंपादक विलास आठवले यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भूषण पत्रकारिता पुरस्कार लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असणारे सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांना संत गाडगेबाबा सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला.

 

 

दरवर्षी सदर पुरस्कार १ जानेवारी रोजी जाहीर केले जातात परंतु यावर्षी जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी भाई केशवराव धोंडगे यांचे दुःखद निधन झाल्याने सदरील पुरस्कार जाहीर करण्यास विलंब झाला. दिनांक ९ जानेवारी रोजी बैठक घेऊन प्रतिष्ठाणचे सचिव मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत कै . दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण व हिंदवी बाणा लाईव्ह च्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले .

गेल्या चार वर्षापासून पत्रकारांचा सन्मान केल्या जातो. २०२२ च्या पुरस्कारासाठी २८ डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने केले होते. या आवाहानाला जिल्ह्यातील 16 तालुक्यातील पत्रकारांनी प्रतिसाद देऊन प्रस्ताव पाठवले. या प्रस्तावाची प्रतिष्ठानच्या वतीने छाननी करून राज्यस्तरीय , मराठवाडा स्तरीय तसेच जिल्ह्यातील पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या निवडीत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार हा न्यूज स्टेट महाराष्ट्र टिव्ही चॅनलचे उपसंपादक विलास आठवले यांना तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भूषण पत्रकारिता पुरस्कार लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना जाहीर करण्यात आला तसेच सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांना संत गाडगेबाबा सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला .

राजू गिरी Tv9 चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांना महात्मा फुले उत्कृष्ट पत्रकारिता जिल्हास्तरीय पुरस्कार, राम तरटे दैनिक उद्याचा मराठवाडा उपसंपादक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राम विकास पत्रकारिता पुरस्कार, वसंत बिराजदार दैनिक वतनवाला लोहा प्रतिनिधी यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार, दत्ता शेरकर दैनिक देशोन्नती माहूर प्रतिनिधी यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शोध पत्रकारिता पुरस्कार, संदीप तुपकरी दैनिक लोकमत हदगाव प्रतिनिधी यांना आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदर्श पत्रकारिता पुरस्कार, रामराव भालेराव दैनिक एकमत अर्धापूर प्रतिनिधी यांना प्रबोधनकार ठाकरे पत्रकारिता पुरस्कार, मिलिंद सरपे दैनिक सकाळ किनवट प्रतिनिधी यांना काय वसंतराव नाईक हरितक्रांती पत्रकारिता पुरस्कार, किशोर संगेवार दैनिक पुढारी मुखेड प्रतिनिधी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पत्रकारिता पुरस्कार, प्रकाश पोवाडे दैनिक पुण्यनगरी बिलोली प्रतिनिधी यांना बाळासाहेब ठाकरे रोखठोक पत्रकारिता पुरस्कार, लक्ष्मण अमृतराव हिरे दैनिक लोकपत्र भोकर प्रतिनिधी यांना डॉ. शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार, गणेश कुंटेवार दैनिक सामना प्रतिनिधी कंधार यांना कै. सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार, लक्ष्मण तुतेराव दैनिक लोकमत धर्माबाद प्रतिनिधी यांना, भाई केशवराव धोंडगे पत्रकारिता पुरस्कार, अनिल कदम दैनिक सकाळ देगलूर प्रतिनिधी यांना कै . माधवराव आंबुलगेकर पत्रकारिता पुरस्कार, दत्ता गणपतराव शिराणे दैनिक प्रजावाणी हिमायतनगर प्रतिनिधी यांना कै. विलासराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार, ईश्वर पिन्नलवार दैनिक सत्यप्रभा मुदखेड प्रतिनिधी कै. गोपीनाथराव मुंडे पत्रकारिता पुरस्कार, सय्यद फिरोज फारुख पटेल दैनिक समीक्षा उमरी प्रतिनिधी यांना कै. रवींद्र रसाळ पत्रकारिता पुरस्कार, माधव चव्हाण दैनिक गाववाला नायगाव प्रतिनिधी यांना, कै. दुर्गादास सराफ पत्रकारिता पुरस्कार. असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

 

२०२१ चे पुरस्कार हे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देऊन पत्रकारांचा गौरव केला होता यावेळी २०२२ चे सदरील पुरस्कार नामांकित व्यक्तींच्या हस्ते वितरण केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *