नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर  यांची ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आकस्मिक भेट ; डॉ लोणीकर यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

 ग्रामीण रुग्णालय कंधार येथे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आकस्मिक भेट दिली.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.आर. लोणीकर  यांच्या उपस्थित रुग्णालयातील सर्व कामकाज व सर्व विभागाची पाहणी केली .

 नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी कामामध्ये तत्पर असलेले योग्य प्रशासन राष्ट्रीय कार्यक्रम नियोजन लसीकरण साथरोग येणारी महामारी यांचे नियोजनाबद्दल जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी  कौतुक करून सन्मान केला व काम समाधान कारक असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे   कौतुक केले

 

 

 

*”विशेषबाब ‘”*

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांचा उत्कृष्ठ कामबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,.व असेच काम होत राहावे अशा सूचना दिल्या.

रुग्णालयातील स्वच्छता तसेच सुमन कार्यक्रम, कायकल्प कार्यक्रम,ऑक्सिजन PSA प्लांट ची पाहणी केली व तसेच रक्त साठवण प्रयोगशाळाची पाहणी केली,प्रसूती विभाग,शस्त्रक्रिया विभाग,प्रसूती पश्चात विभाग,कुटुंब नियोजन विभाग,पुरुष वॉर्ड, स्त्री वॉर्ड ,एक्लेमसीया विभाग,आयुष्य उद्यानाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले तसेच नवीन इमारतीची पहाणी केली आणि रेग्युलर लसीकरण विभाग, राष्ट्रीय गुणवत्ता तपासणी मोहीम यासंदर्भात काही सूचना व मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर  यांनी नवीन उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून शस्त्रक्रिया वॉर्ड प्रसूतिगृह विभाग व आतमधील कामाबद्दल श्री.जोशी साहेब यांना सूचना दिल्या.

सर्वं विभागाचे रेकॉर्ड चेक करून समाधान व्यक्त केले व इतर सर्व कामांचा आढावा घेतला. रुग्णालयीन कामकाज व्यवस्थित असल्याची पाहणी केली.यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले,
डॉ.संतोष पदमवार,डॉ.रविकिरण पोरे,डॉ.गौरव घोलप,
डॉ.दत्तात्रय गुडमेवार,डॉ.श्रीकांत मोरे,डॉ.अरुणकुमार राठोड, डॉ.गजानन पवार, डॉ.शाहीन बेगम,डॉ.नम्रता ढोणे,डॉ.उजमा तबसुम,डॉ.प्रज्वला बंडेवार, डॉ.निखहत फातेमा तसेच कर्मचारी ज्ञानेश्वर बगाडे,
शीतल कदम ,राजश्री इनामदार, शिल्पा केळकर, योग्यश्री कबीर,अश्विनी जाभाडे,पल्लवी सोनकांबळे,आऊबाई भुरके (अधिपरिचरिका),प्रियांका गलांडे, सुरेखा मैलारे ,सुनीता वाघमारे, ज्योती तेलंग,अनिता तेलंगे, ज्ञानेश्वरी गुट्टे, (परिचारिका) निमिषा कांबळे सुनीता राठोड (औषध निर्माण अधिकारी),
दिलीप कांबळे,घोरपडे लक्षमन ,शंकर चिवडे,सचिन ठाकूर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ ),सुशील वडजे आशिष भोळे, अरविंद वाठोरे,राजेंद्र वाघमारे ,प्रदीप पांचाळ नरसिंग झोटींगे,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *