शुल्लक वाद-विवाद न्यायालयापर्यंत न जाऊ देता गावपातळीवरच मिटवा : न्या. कमल वडगावकर

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

गावातील छोटे-छोटे वादविवाद शुल्लक कारणावरून न्यायालयापर्यंत जातात. त्यामुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ही बाब योग्य नसून अशी किरकोळ प्रकरणे न्यायालयात न जाता गाव पातळीवरच मिटवून घेणे योग्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कमल वडगावकर यांनी फुलवळ येथे कायदेविषयक शिबिरात व्यक्त केले.

ता. १० जानेवारी २०२३ रोज मंगळवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या माध्यमातून ‘न्याय आपल्या दारी’ फिरते कायदेविषयक शिबिर व लोकअदालत चे आयोजन आले होते.

या लोकन्यायालया मध्ये कंधार अभिवक्ता संघाचे पॅनल मधील ॲड.अनिल डांगे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या माध्यमातून ‘न्याय तुमच्या दारी’ या विषयावर आपण जास्तीत जास्त प्रकरणे मिटवून निकाली काढावे व वेळ आणि पैसा वाचवावा. माननीय उच्च न्यायालया मार्फत हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्याचा पूर्ण उपयोग करून केसेस कमी करण्यासाठी मदत घ्यावी आणि शक्यतो अशी शुल्लक प्रकरणे गावपातळीवरील लोकअदालतीमध्येच मिटवावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील पक्षकारांनी फायदा घ्यावा असा सल्ला दिला.

पॅनल मधील ॲड.अभय देशपांडे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना लोक न्यायालयामध्ये अनेक प्रकरने वर्षानुवर्ष प्रलंबीत असतात त्यामुळे कमी कालावधीत आपल्याला न्याय मिळणे शक्य नसते. अशा प्रकरणांना बराच कालावधी लागत असतो. ही बाब आपणा सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे अशी प्रकरणे कायदेविषयक शिबिर व लोक अदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांना बोलावून कमी वेळेत आणि मोफत न्याय दिला जातो. याचा फायदा पक्षकारांना १००% मिळतो. अशी बाब ग्रामस्थांना माहिती असणे गरजेचे आहे. यासाठीच भारत सरकारच्या वतीने कायदेविषयक शिबिर व लोक अदालतीचे आयोजन ग्रामीण भागात करण्यात येत असल्याचे सांगितले.

या शिबिरातील प्रमुख अतिथी माननीय न्या. सौ.कमल वडगावकर त्यांच्या समवेत असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा कायदेविषयक शिबिरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमतः पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी फुलवळच्या सरपंच सौ.विमलबाई मंगनाळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष डी.टी. मंगनाळे, ग्रामविकास अधिकारी अमृता मंगनाळे, ॲड.कदम, ॲड.उमर शेख, आर.एम. सोनकांबळे, एस.यु. चव्हाण, आर.सी. सोनुले, विकास लोंने, पोलीस पाटील इरबा देवकांबळे, नागनाथ मंगनाळे, मधुकर डांगे यांच्यासह ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

या शिबिराचे सूत्रसंचालन व आभार विश्वांभर बसवंते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *