कंधार ; प्रतिनिधी
महात्मा फुले विद्यालय शेकापूर चे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांची नुकतीच अखिल महाराट्र माध्य.व उच्च मा. मूख्याध्यापक संयूक्त महामंळ पूणे च्या सचिव पदी निवड झाली त्याबद्दल , आज दि. ११ जानेवारी रोजी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.एन .केंद्रे यांनी त्यांच्या निवास स्थानी कंधार येथे शाल पूष्पहार देऊन यथोचित सत्कार केला .
मोतीभाऊ केंद्रे यांची हाथोटी व सर्वांना आपले से करून मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे आणि सर्वना घेवून चालण्याचे नेतृत्व गुण असल्याने त्यांनी आतापर्यत विविध महत्वाची मानाची पदे मिळवली व त्या पदावरून सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे काम केल्या असल्याचे प्रतिपादन यावेळी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.एन .केंद्रे यांनी केले व भरभरून शुभेच्छा दिल्या .
यावेळी सेवानिवृत्त प्रा.शिंदे एम.एम. व सेवानिवृत्त पर्यवेक्षक व्ही.के. केंद्रे यांचाही शाल व पूष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला .