आंबुलगा येथे श्री संत माणिक प्रभू महाराजांच्या यात्रे निमित्ताने जंगी कुस्त्याचा डाव रंगला

कंधार ( गऊळ )

कंधार तालुक्यातील आंबुलगा या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत माणिक प्रभू महाराजांची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते या यात्रेला श्री संत माणिक महाराजांच्या दर्शनाला फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

आंबुलगा पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील अनेक खेडी तांडे, वस्ती ,वस्त्या ,वाड्या गावे, जोडलेली नाळ आणि दीडशे वर्षापासून ही चालत आलेली यात्रा श्री संत माणिक प्रभू महाराजांचा चमत्कार आहे.नवसाला पावणारा आणि भक्तांना आशीर्वाद मिळत असतो. प्रत्येक व्यक्ती हा ता नौकरी, शेतकरी, व्यापारी हे बाहेर गावी असो ते नक्की यात्रेला येणारच हे ठरलं.

आंबुलगा येथे होणाऱ्या शेवटची कुस्ती विजय मानकरी ठरले सय्यद अजीम सोनवळा ता. जळकोट कुस्तीचा मैदानावर प्रतिनिधी सरपंच मुसळे उपसरपंच सचिन गुद्दे, गोविंद टेंभुर्णी, श्याम वडजे, निवृत्ती तेलंग, अरुण वडजे, सदा वडजे ,किरण वाघमारे, गोविंद बडूरे, एन.जी.नवघरे ग्रामसेवक,
हे कुस्त्या शांततेत पार पडण्यासाठी जमादार काळेसाहेब, टाकरस साहेब, घुगे साहेब समस्त गावकरी मौजे आंबुलगा पंचक्रोशीतील टोकवाडी ब्रह्मवाडी, पिंपळाची वाडी, यांच्या सहकाऱ्यांने हा कुस्तीचा कार्यक्रम शांततेत झाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *