केंद्र शासनाने अंतोदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना जानेवारी पासून मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती तहसीलदार तथा प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने गरीब कुटुंबातील अंतोदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना राशन दुकानातून कोणताही एक रुपया न घेता सर्व राशन मोफत वाटप करण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.
कंधार तालुक्यात अंतोदय योजनेतील .प्राधान्य कार्ड संख्या 37149 प्राधान्य लोकसंख्या 175032 एवढी आहे तर अंत्योदय योजनेतील कार्ड 3141 कार्ड संख्या असून लोकसंख्या 14639 एवढी आहे .
त्यांना या जानेवारी महिन्यात राशन दुकानातून मोफत राशन मिळणार आहे. यात केवळ दोन योजनेतीलच लाभार्थ्यांना मोफत राशन उपलब्ध होणार आहे. तर शेतकरी एपीएल कार्ड धारकांना शासनाने कोणतेही मोफत धान्य दिले नसून त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही. या महिन्यापासून शहर व तालुक्यात वरील दोन योजनेतील लाभार्थ्यांना राशन दुकानातून मोफत धान्य मिळणार असून नागरिकांनी, कार्डधारकांनी कोणताही एक रुपया न देता मोफत धान्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अनुपसिंग यादव व पुरवठा विभागाचे नायब तहसालदार संतोष कामठेकर यांनी केले आहे.