नांदेड ;लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श जिजाऊंनी घालून दिला.
स्वराज्याच्या प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊ आणि आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वानं जगभरातल्या तरुणांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, दिनांक: 12 जानेवारी 2023 रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, समितीचे उपायुक्त तथा सदस्य, श्री. ए.एम. शेंदारकर साहेब यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी, एस.जे रणभिरकर, व्ही.बी.आडे, साजिद हाशमी, शिवाजी देशमुख, संजय पाटील, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, यांची उपस्थिती होती..!