मौ. बोरी खुर्द येथील कॉनाल मध्ये व्यंकटेश ज्ञानोबा पांचाळ वर्ग 7 वी तील विद्यार्थी दि १४ जानेवारी रोजी दुपारी 2:45 वाजता पाणी पिण्यासाठी गेला असता पाय घरून काॅनाल मध्ये पडला व वाहून गेला .
त्याचा शोधाशाध कंधारचे तहसीलदार अनुपसिंग यादव यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार संतोष कामटेकर ,मंडळधिकारी पटणे , समन्वयक मन्मथ थोटे , तलाठी व सेवक राखे हे प्रत्यक्ष काॅनाल वर फिरून पाहत केली .
आज दि १५ जानेवारी रोजी सकाळी 11:45 वाजता सदरील मुलाची डेडबाॅडी सापडली. त्यानंतर खाजगी वाहनात pm साठी माळाकोळी येथे पाठवण्यात आली आहे . ऐण संक्रात सणात गावावर शोककळा पसरली आहे .
सदरील शोधकार्यात मौ. बोरी खुर्द येथील सरपंच प्रतिनिधी रामकिशन अंबादास पंदणवाड, घोरपल्ले सुर्यकांत व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी सहकार्य केले .