शिवसेना,मराठा सेवासंघ अखिल भारतीय छावा संघटना व संभाजी ब्रिगेड तालुका कंधार च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक दिनी शहरातील विठ्ठल रुकमाई मंदीरा जवळील छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतण्यास अभिवादन करण्यात आले .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयजयकारांने परिसर दनानला .
यावेळी बळीराम पाटील पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष , पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण , शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव , संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे , छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी पा लाडेकर , संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष विकास पाटील लुंगारे , आतूल पापिनवार आदीची यावेळी उपस्थिती होती .