जनसंपर्क व कामाचा वेग वाढवा ; निवडणूकीत निश्‍चित यश – अशोकराव चव्हाण ….. हाथ से हाथ जोडो अभियानाचा 26 जानेवारी पासुन शुभारंभ

नांदेड – भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती झाली आहे. ही वातावरण निर्मिती कायम ठेवत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी दोन वर्ष जनसंपर्क व कामाचा वेग वाढविल्यास येणाऱ्या सर्व निवडणुकीत निश्‍चित यश मिळेल. असा विश्‍वास राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

दि. 26 जानेवारी पासुन हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ होणार आहे या पार्श्‍वभूमीवर नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतिने सोमवार दि. 16 जानेवारी रोजी मगनपुरा भागातील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठनेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापुरकर, जिल्हाध्यक्ष गोविदराव शिंदे नागेलीकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर यांच्यासह सर्व तालूकाध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमीटीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढए बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, आगामी दोन वर्ष निवडणुकांचे आहेत. यावर्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका व पुढील वर्षी विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत.
आपण जे बोलतो ते करतो यामुळे लोकांचा आपल्यावर विश्‍वास आहे. यातूनच सर्व निवडणूकीत यश मिळत आहे. हा विश्‍वास असात कायम रहावा यासाठी आगामी काळात जनसंपर्क व कामाची गती वाढविने गरजेचे आहे. राहुल गांधा यांच्या भारत जोडो यात्रेतून वातावरण निर्मिती झाली आहे. आता हाथ से हाथ जोडो अभियानातून वातावरण निर्मिती टिकविणे गरजेचे आहे.

यावेळी बोलतांना ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील म्हणाले की, बेरोजगारी, महागाई यातून सरकार विरोधात जनतेत संतापाचे वातावरण आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून झालेल्या वातावरण निर्मितीचा आगामी निवडणूकीत आपणास लाभ होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आ. आमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी हाथ से हाथ जोडो अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकांना गण व गटनिहाय नियुक्ती पत्रे देण्यात आली. उपस्थितांचे आभार जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगावकर यांनी मानले. तर सूत्रसंचलन संतोष देवराय यांनी केले. याबैठकीस जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *