नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या, नांदेड जिल्हा कार्यकारणीवर,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षाताई संजय भोसीकर यांचा पक्षातील संघटन कार्याची व कॉंग्रेस डिजीटल सदस्य नोंदणी अभियानात महिलांमध्ये जिल्हयात अव्वल झालेल्या कामांची दखल घेऊन त्यांची नांदेड जिल्हा काँग्रेस जिल्हाउपाध्यक्षा पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण , यांच्या हस्ते नांदेड येथे सदर निवडीचे नियुकी पत्र देण्यात आले .
महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली, कविता अमर कळसकर जिल्हाध्यक्षा, नांदेड. यांच्या सोबत पक्षाचे काम सक्षमपणे करणार असून ,माझ्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी अती महत्वाची असून काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार सर्वांना सोबत घेऊन, महिला संघटन विकास करणे व काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होईल यासाठी मी सतत प्रयत्नशिल राहिल असे निवडी बद्दल माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षाताई भोसीकर यांनी सांगितले .
तसेच नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांची निवड केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरभाऊ राजुरकर,माजी मंत्री डि.पी सावंत,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर,यांचे आभार मानले .
नांदेड येथे संपन्न झालेल्या निवड कार्यक्रमात आमदार मोहनआण्णा हंबर्डे,आमदार जितेश अंतापुरकर , प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक सौ.अर्चना राठोड , जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ.कविताताई कळसकर,प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सौ.रेखाताई चव्हाण डॉ.सौ.मीनाक्षी काकडे,माजी सभापती संजय आप्पा बेळगे,सुरेंद्र घोडजकर,संजय भोसीकर,बालाजी पांडागळे,शरद पवार,संतोष पांडागळे, शहाजी नळगे आदीसह कार्यकर्ते उपस्तिथ होते .
सौ .वर्षाताई भोसीकर यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे .