प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी येथे सांस्कृतीक कार्यक्रम

लोहा ; प्रतिनिधी

प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा येथील शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली कला,नृत्य , अभिनय,देशभक्ती गीत, भारूड,एकपात्री समाज प्रबोधन नाटक,ग्रामिण कला व समस्या चे सादरीकरण करत भरभरून प्रतिसाद दिला.

सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेस उपाध्यक्षा,सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांच्या हस्ते सांस्कृतीक कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उदघाटन करून त्यांनी बालकलाकारांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर,यशवंत पाटील भोसीकर, मुख्याध्यापक अशोक साफनर, शाळेतील शिक्षक,शिक्षीका,शिक्षकेत्तर कर्मचारी पालक,विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *