श्री संत श्री आसाराम बाबा आश्रम अहमदाबाद द्वारा नांदेड केंद्राच्या वतीने आज कंधार शहरातील शाळांमध्ये 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शाळा कॉलेजमधून जागृती करण्यात आली .
कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत दिनांक 31 जानेवारी रोजी आसाराम बाबा आश्रम नांदेड शाखेचे मुख्य मार्गदर्शक अनंत औंढेकर यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा करणे सह विविध चांगल्या सवयी आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले . तर मुख्याध्यापक वाघमारे डी जी . यांनी कार्यक्रमाची प्रास्तावणा करत शाळेतील विविध उपक्रमाचा उल्लेख करत मार्गदर्शन केले . कार्यक्रमासाठी श्रीमती मग्गीडवार विजया , सौ लोलगे , सौ राधा शिंदे मुख्याध्यापक डि .जी. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी विद्यार्थ्यांना बालसंस्कार पुस्तक , माहिती पुस्तिका , कॅलेंडर व पॅड हे शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली . शाळेतील शिक्षिका सौ कागणे यु एम , शिक्षक आंनदा आगलावे , राजू केंद्रे , यामिनी मोटभरे ,माणिक बोरकर , चंद्रकला तेलंग आदींनी परिश्रम घेतले .
दरम्यान कंधार शहरातील मनोविकास विद्यालय , प्रबोधनकार ठाकरे विद्यालय व श्री गणपतराव मोरे विद्यालय आदीसह ठिकठिकाणी 14 फेब्रुवारी 2023 व्हॅलेंटाईन डे ऐवजी शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुण तरुणीने 14 फेब्रुवारी हा मातृ पितृ दिन म्हणून साजरा करावा व माता पिताचे पूजन करण्याचे आवाहन मुख्य मार्गदर्शक आनंद औढेंकर यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर एस केंद्रे यांनी मानले .