नांदेड :- तरोडा (बु.) येथील लक्ष्मीनारायण नगरमधील अंतर्गत रस्त्यासांठी महापालिकेने निधी मंजूर केला असुन या नगरात निर्माण करण्यात येणाऱ्या सीमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपूजन जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. सुषमा पांडागळे या दाम्पत्यांचे हस्ते करण्यात आले.
लक्ष्मीनारायण नगरमीधल रस्त्यांची अनेक वर्षापासून दूरावस्था होती. यासाठी संतोष पांडागळे यांनी महानगरपालिकेकडे तत्कालीन महापौर सौ. जयश्रीताई पावडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन अंतर्गत रस्त्यावरील सीमेट काँक्रीटकामाची मंजुरी मिळवून घेतली. त्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी नगरसेविका सौ. कविता संतोष मुळे, माजी नगरसेवक प्रतिनिधी ॲड. धम्मा कदम, सखाराम तुप्पेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
लक्ष्मीनारायण नगरमधील बहुतेक सर्व अंतर्गत रस्त्यांना आता निधी उपलब्ध झाला असुन ही कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे नगरातील रहिवांशामध्ये समाधानाचे वातावरण आहे.