कंधार शहरातील श्री बालाजी मंदिर येथे मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी आयोजित केलेल्या कृषीवल हळदीकुंकू कार्यक्रमास शहर व परिसरातील हजारो महिलांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत शांततेत व उत्साहात संपन्न झाला,
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षा तथा कृषीवलच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. चित्रलेखा ताई पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आशीर्वाद तुझा एकविरा आई फेम सिने अभिनेत्री मयुरी वाघ, जीवाची होतीया काहिली मालिका फेम श्रुती सावंत, गाथा नवनाथाची मालिका फेम जयेश शेवळकर, कृषीवलच्या माधवी सावंत सह प्रमुख पदाधिकारी व सिने कलाकार उपस्थित होते,
यावेळी व्यासपीठावरून बोलताना सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की मकरसंक्रांति निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सर्व महिला भगिनींसाठी अत्यंत आनंदाचा व सौभाग्याचा असतो व हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजेच संबंध महिला भगिनींसाठी दिवस मानाचा सौभाग्याचा, सन्मानाचा व अस्मितेचा असल्यामुळे महिलांना समाजामध्ये वावरत असताना विविध क्षेत्रात महिलांना न्याय व मान सन्मान मिळालाच पाहिजे व मतदारसंघातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मी येणाऱ्या काळात विविध बचत गट व विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमणीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले, यावेळी उपस्थित सिने कलाकार यांनी उपस्थित हजारो महिलांशी मनमोकळेपणे संवाद साधला,
यावेळी आशाताई शिंदे व सीने अभिनेत्री यांच्या हस्ते महिला भगिनींना हळदीकुंकू व वाणाचे वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम दुपारी पाच वाजता पासून या कार्यक्रमास शहर व परिसरातील महिलांनी अलोट गर्दी केली होती ,अत्यंत शांततेत व उत्साहात जवळपास पाच तास चाललेल्या या हळदीकुंकू कार्यक्रमास शहरातील व परिसरातील महिला भगिनींनी अलोट गर्दी केली होती यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचे स्वागत करून आभार मानले.
नांदेड जिल्हा ही पूर्ण शेकापमय होईल: सौ. चित्रलेखा ताई पाटील
अलिबाग रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे आज पर्यंत कायम वर्चस्व राहिलेले असून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचे लोहा कंधार मतदार संघातील व नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य हजारो महिला नागरिकांना व शेतकरी ,कष्टकरी, वंचित उपेक्षितांना तळमळीने न्याय देण्याचे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उल्लेखनीय कार्य पाहून मी आजच्या या कृषीवल हळदी कुंकू कार्यक्रमात एवढी मोठी महिलांची प्रचंड गर्दी पाहिल्याने आशाताई वर मतदारसंघातील व जिल्ह्यातील हजारो लोक त्यांच्या पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याने माझा दृढ विश्वास झाला आहे की येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यावर आगामी काळात शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता राहील असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा तथा कृषीवलच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ.चित्रलेखा ताई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.