फुलवळ ता.कंधार येथील रहिवासी असलेले रज्जाक घुडुसाब मोमीन हे ता.२४ ऑक्टोबर १९८९ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील हिंगोली आगारात एस.टी. चालक म्हणून रुजू झाले. आणि ता.३० एप्रिल २०१९ रोजी कंधार आगारातून सेवानिवृत्त झाले. तब्बल २९ वर्ष चालक पदावरून सेवा देताना त्यांच्या हातून कसलाच अपघात झाला नसल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने त्यांचा विनाअपघात सेवा देणारे चालक म्हणून सपत्नीक सत्कार करून सन्मान चिन्ह , सुरक्षित सेवेचा बिल्ला , प्रशस्तीपत्र व २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विभाग नियंत्रक मंगेश कांबळे , विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे , कामगार अधिकारी गवारे , विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी वंदना सुरेश चापोलिकर , विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी खंदारे , विभागीय भांडार अधिकारी अवधन सर , विभागीय आस्थापना पर्यवेक्षक सुधीर पटवारी , वाहतूक निरीक्षक सुनील जाधव यांच्यासह अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.