कंधार तालुक्यातील फुलवळ येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हनुण फुलवळचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा पं सदस्य बालाजी देवकांबळे व मोहनेश्वर पांचाळ हे उपस्थित होते.
प्रथमतः विश्वकर्मा च्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद पांचाळ, अरुण पांचाळ,दिगांबर पांचाळ,रंगनाथ परमेश्वर पांचाळ, मंगेश गोविंदराव पांचाळ, विष्णुकांत रामराव पांचाळ, नितीन प्रल्हाद पांचाळ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पत्रकार मधुकर डांगे , पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश रामपुरे , बापूराव मंगनाळे , गोविंद पांचाळ , ज्ञानेश्वर पोतदार , परमेश्वर पांचाळ , साहेबराव देवकांबळे सह गावातील जेष्ठ नागरिक , महिला व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.