कंधार ;
हजरत सरवरे मगदुम रहे.(बडी दर्गाह) कंधार यांचा ७०८ वा उर्से दि ८ फेब्रुवारी २०२३ रोजी दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने दि ७ फेब्रुवारी २०२३ ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले .उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन बाहोद्दीन यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दिन हुसैनी यांनी दिली .
हाजी सय्याह सरवरे मगदुम रहेमतुल्लाह अलैही मोठी दर्गाचे वंशज सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दिन हुसैनी व मुतवली सय्यद शहा मुजतबा हुसैनी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 जानेवारीला रोजी बैठक घेण्यात आली.यामध्ये ऊर्स कमिटीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी माजी नगरध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन बाहोद्दीन, उपाध्यक्ष सय्यद मजहर अली, सचिव समीर चाऊस,
सहसचिव अँड मिर्झा अथर बेग, कोषाध्यक्ष सय्यद अमजद इनामदार, सदस्य माजी सरपंच शेख फारुख, माजी नगरसेवक अब्दुल खादर, माजी नगरसेवक शेख मन्नू, सय्यद अहेमद अली गौस अली, शेख रब्बानी, मोहम्मद जफर मो. अकबर, मोहम्मद फारुख ताज मोहम्मद, मोहम्मद खैसरोद्दीन, मुशताक हाशमी, सय्यद सलीम, मोहम्मद खदीर कुरेशी, गुलाम रसूल(बाबा), शेख हुसेन पाशा, शेख जावीद, शेख नवाब पाशा, मोहम्मद खालेद खुरेशी तसेच दर्गा कमेटी म्हणून शेर मोहम्मद हकीमसाब, माजी उपनगरध्यक्ष मोहम्मद हमीदोद्दीन, मिर्झा सिकंद्दर बेग,
शब्बीर खान, गुलाम गौस चुन्नू मास्टर, हाजी मोईन बागवान, शेख अल्लाउद्दीन चौधरी यांची निवड करण्यात आली.सदरील निवड बडी दर्गाचे वंशज सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दिन हुसैनी व मुतवली सय्यद शहा मुजतबा हुसैनी यांनी केली.
८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उर्सामध्ये राजस्थान, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणे सर्व धर्माचे भाविक भक्त मोठया संख्याने येत असतात.हा ऊर्स पाच दिवस चालणार असुन उर्सा निमित्य विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक सात फेब्रुवारी पासून उसाचा प्रारंभ धार्मिक विधीने होणार आहे.
८ फेब्रुवारी रोजी संदल ,
दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रसादाचे वाटप , दुपारी २ वाजता कुसत्यांची दंगल व संध्याकाळी ८ वाजल्यापासून कव्वालीचा कार्यक्रम होणार असून यात टि व्ही स्टार समिर हयात (दिल्ली) शाहिन सबा (झारखंड) टि व्ही स्टार चा मुकाबला होणार आहे.
दि १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ पासून कुलहिंद मुशायरा (हास्यकवी संमेलन) ज्यामध्ये नामांकित कवी सहभाग घेणार आहेत. या उर्सा साठी भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उरूस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद जफारोद्दीन यांनी केले .