निसर्गाने मानवाची निर्मिती केली. त्याची निर्मिती करताना मानवाला अनेक गुण अवगुणानी सजविले . त्याला मडविले. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा मानाव स्वार्थी, मतलबी, द्वेषी होत गेला.एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी तो धडपडू लागला. तसं पहाता सजीव प्राण्यात नेहमीच श्रेष्ठत्वाची होड पहायाला मिळते.आपण पहातोच की कुत्र्याचे पिल्लं, कोंबडीचे पिल्लं किंवा प्रत्येक प्राण्याची व पक्ष्यांची पिल्ले एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी भांडतात. एकमेकांवर कुरघोडी करतात .या संघर्षात बळी नेहमीच निर्बलाचा पतन करतों. सबळ निर्बलाचे कान पिळत असतो.निसर्गातल दुर्बल जीव नेहमीच सबलाचे अन्याय सहन करतो .व अन्याय सहन करत आला आहे .
बळी तो कान पीळी हे मानवाने मानवासाठी निर्माण केलेले वाक्य म्हणा की म्हण म्हणा.मानुस मोठ्या दिमाखाने सांगतोय ‘ अरे भांडण करणे , युद्ध करणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे.’ आपल्या कुटुम्बापासून आपण सुरू करूया. कुटुम्बात कलह , भावकीत कलह , शेजारी शेजारीत कलह , गावात कलह ते थेट जगातील देशात कलह .पृथ्वीच्या खंडावर जवळपास लहान मोठे दोनशे देश आहेत. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी या देशांमध्ये काही तरी घडत असते. घडणाऱ्या गोष्टी प्रेमापाई कमी असतात व व्देषापोटी जास्त घडत असतात.
आपल्या देशात शांतता नांदू नये, देशाची भरभराट होवू नये म्हणून आपले शेजारी राष्ट्र चीन, पाकिस्तान हे नेहमीच आपल्याशी कुरापत काढत आहेत, नव्हे नेहमीच उचापती करत युध्दाचे कारण शोधत असतात. त्यांना भारतात शांता नकोय. त्यांना भारताची प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपतेय. कालाच एका लोकप्रीय दैनिकात बातमी होती चीन सिमेवरील भारताच्या पासष्ट चौक्यापैकी सवीस चौक्यांवर चीनने ताबा मिळवलेला आहे. चीनने भारताची शांतता म्हणजे दुबळेपणा समजू नये . हे १९६२चे साल नव्हे तर २०२३चं साल आहे भूतकाळात शेजारी रमू नयेत
इकडे कंगाल पाकिस्तान चीनच्या मांडीवर बसून जगातील दुसऱ्या देशाकडे भिक मागतोय व भारतासोबत युदध करण्याची भिक्कार खुमखुमी बाळगतोय .अधुनमधुन अमेरिकाही पाकिस्तानला कुरवाळत असते .उदेश एवढचं की भारताने मान उंच करुन अमेरिकेपुढे चालू नये .
काहीही असो प्रत्येक देशाला स्वतःच स्वातंत्र अबाधित राखण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यासाठी तेथील जनता देशासाठी प्राण देण्यास,आहुती देण्यास तयार असते.जगातीत देशात सदासर्वदा कुठेन कुठे युध्य चालू असते. युद्ध नसेल ही .संघर्ष चालू रहातो . पूर्वी पाहिल्या व दुसऱ्या महायुद्धात दोन शेजारी राष्ट्रात द्वेषाचं विषारी धूर निघत निघत जगाने दोन विश्वयुद्ध अनुभवले आहेत.त्या महायुद्धात विशेष करुन दुसऱ्या महायुद्धात अतिशय अपरीमितहानी झालेली आहे .लाखो लोक आपले जीव गमावले. लाखो जखमी झाले .अणुबॉम्ब सारखं आस्त्र वापरलं गेलं .जगाची राखरांगोळी होताना त्याकाळचे महान नेते पहात होते ;पण तेही एकमेकांचे शत्रू होते.दुसरं महायुद्ध संपलं व अमेरिका रशिया यात शक्तीशाली कोण याची होड लागली.त्यातून शितयुदधाचा जन्म झाला. ते शीतयुद्ध सोवियेट रशियाचे विभाजन होईपर्यंत टिकले.
रशियातून पंधरा प्रांत फुटून नविन पंधरा देश जन्माला आले. भारत देशा येवढा भाग रशियातून फुटून निघाला. रशियाची जगातील सैनिकी पत कमी झाली .अमेरिका हा एकमेव महाशक्ती म्हणून जगात मिरवू लागला
अमेरिका लोकाशाही देश हे म्हणायला ठिक आहे .पण अमेरिका जगातील दुबळ्या देशावर नेहमीच हुकमत गाजवतोय व हूकमत गाजवत आलाय . पण त्या देशाला हुकमशाही राष्ट्र म्हणण्याची हिंमत कोणत्याही राष्ट्राची होत नाही .अमेरिका दोन शेजारी राष्ट्रात नेहमीच भांडण लावून स्वतःची झोळी भरुन घेतोय.अमेरिकेची झोळी कधीच खाली राहात नाही .अमेरिका एक स्वार्थी देश आहे. तो देश प्रत्यक्ष युद्धात कधीच भाग घेत नाही .युद्धापासून नेहमीच दूर राहातो .स्वतःची शस्त्र आस्त्र विकतो व फक्त स्वतःचा फायदा करून घेतो.छोटाश्या व्हियेतनाम देशाला अमेरिका जिंकू शकली नाही.आफगाण मधूनही स्वतःची रणगाडे सोडून पळ काढणारी अमेरिकाच आहे. अमेरिका पुढे छोटासा क्युबा देश कधीच झुकला नाही .अण म्हणे अमेरिका महाशक्ती .भारतातील काही टीव्ही चॅनलवाले व पाश्चिमात्य मिडीयाने अमेरिकाला डोक्यावर घेतलेले आहे .
जगात युदध सुरु असेल तरच अमेरिकेला फायदा होतो. सध्या अमेरिका युक्रेनचे कपडे सांभाळत आहे. युक्रेन कपडे काढून लंगोट लावून रशियाशी युद्ध करत आहे. अमेरिका जगाला रशियाची भिती दाखवून स्वतःची युद्ध सामुग्री विकून रग्गड पैसा कमावित आहे. अमेरिका युक्रेनला दोस्त राष्ट्र मानतोय. दोस्त म्हणून हस्तादोलन करतोय. सर्व नाटो देश व अमेरिकेचे गुलामराष्ट्र रशियाविरोधात एकवटलेले आहेत.
युद्धाचे परिणाम काहीही हो अमेरिकेचा हेतू सफल होत आहे .ते होणार आहे .अमेरिकेचा हेतू आहे रशियाला प्रत्येक क्षेत्रात दुबळं बनविने, रशियाकडील शस्त्र आस्त्र संपविणे .रशिया महाशक्ती होवू नये हा अमेरिकेचा हेतू सफल होताना दिसतोय. पण यामुळे जग विभागलं चाललय. जगात छोट्या राष्ट्राच्या मनात भिती पसरत आहे. गरिबी, दारिद्रय , वर्णभेद , वंशभेद वाढत आहे . यामुळे जग तिसऱ्या विश्व युध्दाच्या उबंरवट्यावर ऊभा आहे . अणु युध्दाचा धोका वाढला आहे .महागाईने जगात कहर केला आहे .एकमेकांवर चा विश्वास उडत चालला आहे .
आपणास वरवर रशिया व युक्रेन युद्ध दिसत आहे . पण रशिया अमेरिकासह पन्नास देशांशी एकटा लढत आहे .आणुयुध्दाची भिती दाखवून अमेरिका स्वःताच उखळ पांढरं करुन घेत आहे . अमेरिका व त्याच्या बाजूची नाटोराष्ट्र हे युक्रेनचे दोस्त म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निव्वळ नाटक करत आहेत.
आपण मराठी माणसं गळ्यावर हात ठेवून कधी कधी आपल्या मित्राला म्हणतो ” आरे यार तूझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का ‘ मला सांगा मारणारा शत्रू आपल्या मित्राच्या केसाला धक्का कशाला लावेल . तो त्याचं पोट फोडल,डोकं फोडोल, हात तोडेल नाही तर जीव घेईल. पण केसाला धक्का लावणार नाही.आपली शपथ खोटी होती का ?नाहीच . कारण त्याने आपल्या मित्राच्या केसाला हात लावलाच नाही . म्हणून आपण मित्राला मदत केली नाही . मित्र गेला खडयात व आपण सुरक्षित.अमेरिकाही जगात असचं वागत आहे.
युक्रेनला अमेरिका कदाचीत जूने पुराणे शस्त्र विकून तो त्याचे पैसे करुन घेत आहे. अमेरिका, नाटो व इतर देश युक्रेनचे मित्र आहेत .ते त्याला मदत करत आहे .युदध चाललय युकेनच्या भूभागावर.सैन्य मरत आहेत युक्रेनचे . युक्रेनची भौतिक संपती बरबाद होत आहे. निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे . छोटे मुलं हकनाक मरत आहेत. युक्रेनचं आतोनात नुकसान होत आहे. रशियाचा भूभाग सुरक्षित आहे आज तरी . रशिया युक्रेनच एकमेकांवर हल्ले हे युक्रेनच्याच शहरावर होत आहेत . अखंयुध्द युक्रेनच्या भूमीवर लढवले जातय . सर्व नुकसान युक्रेनचं;पण म्हणत आहेत रशिया युध्य हरत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हे जोकर होते .ते त्यांची भूमिका निट वटवित आहेत. जो मित्राच्या सुखदुःखात सहभागी होतो तो खरा मित्र .येथे तर अमेरिका मित्राला विनाशाचा खाईत लोटत आहे .वारे मित्र मित्राला संपवणारा मित्र म्हणजे अमेरिका
अमेरिकाला मैत्रीपेक्षा पैसा प्यारा आहे .अमेरिका मैत्रिला महत्त्व देणारा देश नाही. त्याची झोळी जो भरेल तो त्याचा मित्र. तो मित्र अमेरिकेची झोळी भरताना उद्धवस्त व्हायलय.रशिया युक्रेन युदधात अमेरिका निश्चितच त्याच्या उदेशात यशस्वी झालेली आहे.
रशियाला दुबळं बणविण्यात अमेरिका यशस्वी होताना दिसते. त्याचबरोबर युरोप राष्ट्र अमेरिकवर कसे अवलंबुन राहातील यांचीही काळजी अमेरिका घेत आहे .रशियाला युध्द आता नको आहे. पण अमेरिका हे युद्ध संपवणार नाही व संपुदेणार नाही. रशियाची शस्त्र भांडारे कमी होत आहे . जवान शहीद होत आहेत, पण युक्रेनच कधीच भरुन न येणार नुकसान होत आहे .माणसं , जमीन, इमारती ,शेतीच सर्वचं गोष्टीचं नुकसान फक्त युक्रेनच होत आहे . रशिया काय गमावेल फक्त त्याचे सैनिक व काही शस्त्र हा तर युध्दाचा भाग आहे .
समजा उद्या रशिया उद्धात हरला तर जग म्हणेल रशियानं काय हारवलं युद्धात.तर फक्त काही सैनिक व शस्त्रसाठा गमावला असे म्हणतील ;पण युक्रेन जिंकूनही त्याच्याकडे काय काय शिल्लक रहालेय याचाच हिशेब लावतील .
युक्रेनच काय ? लोक म्हणतील युक्रेन नावाचं एक देश होतं ते संपूर्ण देशच अमेरिकेच्या स्वार्थासाठी जगाच्या नकाशातून नष्ट झालेलं आहे. सध्या तरी युक्रेन आहे नकाशावर पण तो देश नामशेष होण्याचा मार्गावर आहे .अमेरिका रशियाला डिवचण्यासाठी लेपर्ड’, इब्राहीम सारखे रणगाडे व एफ सोळासारखे विमान व इतर शस्त्र पुरवत आहे. रशियाकडेही त्याला पुरुण उरतील एवढी अधुनिक शस्त्र आस्त्र आहेत. अमेरिकेला माहित आहे युक्रेन बरबाद होत आहे. तरी अमेरिका आणि नाटोराष्ट्र सांगत आहेत . युक्रेनच्या केसाला धक्का तर अमेरिकेसह नाटोला धक्का. रशिया कधीही युक्रेनच्या केसाला धक्का लावणार नाही. रशिया युक्रेनचे शहर , कारखाने , जीवनोपयोगी साधने , विजुरवठा खंडित करणे , मुलभूत सेवा नष्ट करुन युक्रेनला जमीनीत गाढत राहणार . वेळ पडलीच तर युरोपलाही दणका देणार .
युक्रेनची मित्र राष्ट्र म्हणणार रशिया तूझ्या केसाला आणखी हात लावतेला नाही त्यामुळे आम्ही मदत करण्यास असमर्थ आहोत .युक्रेनची धुळधान होत आहे हे सर्व जग पहात आहे. अमेरिकेला युद्धबंदि नको आहे .
आता सर्व जगाच्या नजरा भारताकडे वळल्या आहेत. आज भारत एक प्रबळ पण लोकशाहीवर गाढ विश्वास असलेला देश आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला हा देश आहे . येथे अणुबॉम्ब चाचणी केली की भगवान गौतम बुध्द हसतो. भगवान गौतम बुद्धालाही माहित आहे भारत अणुशक्तीधारक असलेला देश आहे तरी तो शांतता प्रिय आहे . शांतता भारताची आण बाण शान आहे .
भारताने युक्रेन रशिया युध्दात तनमनाने भाग घेवून वाटाघाटी केल्यास युदध थांबायला वेळ लागणार नाही . सध्या भारत जी २० देशाचा अध्यक्ष आहे ;इंग्लंडचे पंतप्रधान भारतीय वंशाचे आहेत. भारतीय पंतप्रधानाचे अनेक देशाच्या प्रमुखांशी खास संबंध आहेत. या सर्वाचा उपयोग करुन रशिया युक्रेन युद्ध थांबल्यास भारत जगाचा शांतीचा गुरु बनेल. धूर्त ,कपटी चीन व कंगालीस्तान हे आपोआपच वटणीवर येतील. भारत जगात शांतीदूत म्हणून व एक आदर्श देश म्हणून सर्व जग भारताकडे आशाळभूत नजरेने पहात आहे .
राहून राहून वाटते खरा मित्र मित्राला दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करतो ;पण अमेरिका युक्रेनचा मित्र युक्रेनला नामशेष करायला निघाला आहे का ? हे निश्चित कळायला मार्ग नाही .