चार दिवस रीलॅक्स व्हायला मालदिव ला गेलो आणि तिथल्या निसर्ग सौदर्याने भुरळ घातली.. बोटीने जात असताना सुरुवातीला लाइट ग्रीन दिसणारं पाणी हळूहळू डार्क ब्लु होत गेलं त्यानंतर जसजसं समुद्राच्य आत जाऊ लागलो तसा समुद्र काळा दिसु लागला म्हणजेच त्याची खोली खुप होती त्यानंतर पुढे ब्लु आणि किनाऱ्यापाशी पांढरा ..अनेक छटा दिसल्या .. बोटीने जाताना जाणवलं लाखो जीव या पाण्याखाली मुक्त विहार करत असतील.. करोडो जमीनीवर वावरतात आणि लाखो करोडो आकाशात आणि या सगळ्याना सांभाळतो कोण तर सबका मालिक .
किनाऱ्यावर झुल्यापाशी बसताना असंख्य छोटे प्राणी इकडे तिकडे फिरत होते.. प्रत्येकजण आपल्या वेळेत पोटाची काळजी घेत होता.. बगळा माशासाठी नजर रोखुन बसला होता इतर पक्षीही तसेच काहीसे.. यांना शिस्त कोणी लावली असेल ना.. शंख पाठीवर घेउन फिरताना पाहिलं आणि मनात विचार आला याला याचं ओझे होत असेल का ??..
कासवाला त्याच्या कवचाचं ओझे होत असेल का ?? .. बेबी शार्क समुद्राच्या काठापाशी फिरताना पाहिला आणि मनात विचार आला याच्या आई कडे खोल समुद्रात तो कसा परत जात असेल ना.. परत जायला त्याला मार्ग कसा सापडेल.. आमचं फोटो शुट होइपर्यंत पक्षी आकाशात फिरत राहिले आणि आम्ही तिथुन निघाल्यावर पुन्हा त्यांच्या जागी आले.. आम्हाला आनंद मिळावा म्हणून ते काही काळ बाजूला राहिले ..
बेटावर असंखय लोक रहातात.. चारही बाजूला पाणी त्यांची काळजी घेणारा तोच .. त्याला म्हटलं , तुझी कृतज्ञता तरी किती व्यक्त करावी.. तु दमत असशील नारे ? .. तुझ्या असंखय लिला , अनेक रुपे .. अर्जुनाला सगळच माहीत असणार पण तिथे फक्त आमच्यासाठी त्याच्यामार्फत गीता पोचवलीस त्याचं क्रेडीट सुद्धा तुला नको होतं.. मग मी हे केलं ते केलं आम्ही का म्हणतो कारण ते तु करवुन घेतोस ना..
मालदिवमधे सुट्टीसाठी आल्याने विचार करायला भरपुर वेळ मिळाला .. नव्याने स्वतःकडे पहाता आलं.. माझ्याकडून लिहुन घेउन वाचकांना गाइड करणाराही तुच.. मग माझं काय आहे तर फक्त आणि फक्त कर्म जे सोबत जाणार आहे.. ते उत्तम कसं करता येइल फक्त इतकच मला आयुष्यात करायचय बाकी सगळं तुच पहातोस.. मी जगत असलेलं आयुष्य किती सोपे आहे ना याची जाणीव नव्याने झाली.. माफी मागणं, माफ करणं , बऱ्याच गोष्टी सोडुन देणं आणि जमेल तसं इतरांसाठी जास्तीत जास्त चांगलं करणं फक्त इतकच करायचय आणि हे मलाच नाही तर पृथ्वीतलावरील प्रत्येकाला करायचय.. मग ना उरणार असुया , ना राग , ना मत्सर , ना मोह सरश्रीचं भजन कायम आठवतं..
जाने दो सबकुछ जाने दो चाहतोंको जाने दो.. इच्छाओंको जाने दो.. तेरा है जो लौट के आयेगा.. तेरा नही है चला जायेगा.. जाने दो जाने दो.. यूट्यूबवर जरुर ऐका .. मालदिव ट्रीपने पुन्हा नव्याने मी माझ्याच प्रेमात पडले हेच खरं… तिथेच माझ्याकडुन लिहुन घेतल्या गेलेल्या कादंबरीचे प्रकाशन केले आहे.. ब्युटीज ॲण्ड फॅंटसीज इन सेक्स ही कादंबरी जरुर वाचा..