महारक्तदान शिबीरात कंधार तालुक्यातील रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान करावे – वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांचे आवाहन

कंधार ; ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महा भव्य रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य तपासणी व रक्तांच्या सर्व तपासण्या ठेवण्यात आले आहे. कंधार शहरासह तालुक्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले .

महाराष्ट्र शासन आयुक्त आरोग्य सेवा , अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व आरोग्य संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मा.आरोग्य मंत्री,महाराष्ट्र राज्य यांची संकल्पना आहे .

दिनांक 09 फेब्रुवारी 2023 पासून चार कार्यक्रम घेण्यात येणार आहेत व कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेने व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या सूचनेनुसार आणि कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार शहरातील व ग्रामीण भागातील मुलं मुली यांची सदृढ बालक जागरुक पालक या मोहिमे अंतर्गत बाल आरोग्य तपासणी होणार आहे .

तसेच या तपासणीमध्ये ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची रक्तदाब व मधुमेह, कर्करोग तपासणी कान नाक घसा व दंत तपासणी आणि स्त्रियांच्या आजाराची तपासणी रक्त नमुना तपासणी करण्यात येणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा पालकांनी आपआपल्या बालकांची आरोग्य तपासणी करून आपल्या बालकांना होणाऱ्या आजारापासून बचाव करू शकतो त्यामुळे आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकांना सहकार्य करावे .

ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य तपासणी व रक्तांच्या सर्व तपासण्या ठेवण्यात आले आहे.

तरी कंधार शहरातील व ग्रामीण भागातील युवकांनी आपले रक्तदान करून “गरजुना रक्तदान,हेच श्रेष्ठ दान ” या पवित्र कार्यात सामील व्हा !! रक्तदान अमूल्यदान असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *