महादेव मंदिर जीर्णोध्दार निमित्त आज श्री शिवलिंग व नंदी यांची गावभर मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी गुरुवर्य नामदेव महाराज बारुळकर यांची उपस्थिती होती विरशैव भजनी मंडळ महीला व पुरुष तसेच जनता हायस्कूल कौठा येथील विद्यार्थी व विदयार्थीनीचे लेझीम पथक होते .
कौठा तालुका कंधार येथे शिवलिंग व नंदी प्राणप्रतिष्ठापणा निमित्त दि ९ व १० फेब्रुवारी रोजी महादेव मंदिर येथे केदार जगद्गुरुच्या शूभ हास्ते शिवलिंग स्थापना व नदी स्थापना इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कंधार तालुक्यातील कौठा येथे महादेव मंदिर जीर्णोधारीत प्रमुख गुरुवर्याच्या उपस्थितीत शिवलिंग व नंदी प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी धर्मध्वजा रोहण श्री शिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमुगरेकर व श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या हस्ते होणार आहे .
यावेळी जगद्गुरु भिमाशंकर लिंग शिवाचार्य महाराज श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा श्री शंभुलिग शिवाचार्य महाराज उदगीरकर श्री दिगाबंर शिवाचार्य महाराज वसमत श्री नामदेव महाराज बारुळ श्री प्रणवानंद सरस्वती महाराज वृंदावन श्री राजराजेश्वर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर आदि प्रमुख धर्म गुरुच्या उपस्थित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . दि ९ फेब्रुवारी रोजी दु ४ केदार जगद्गुरु व इतर गुरुवर्याचे आगमन व स्वागत सायंकाळी ७ वा धर्म सभा रात्री ९ ते ११ शि.भ.प.भगंवतराव पाटील चाभारगेकर यांचे शिवकिर्तन दि १० रोजी सकाळी ८ वा होम हवन आदी विधी ११ वा श्री केदार जगद्गुरुच्या शूभ हास्ते लिंग व प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले .