कंधार ; प्रतिनिधी सामान्या जनतेचा बुलंद आवाज आपल्या निर्भीड लेखणीने अन्याय अत्याच्यारावर प्रहार करणारे दैनिक सम्राटचे लेखणी बहाद्दर संपादक बबन कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून,त्यांना कंधार येथे आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे आज दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले.काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.एका झुंजार पत्रकाराचा,संपादकाचा झंजावताचा अखेर शेवट झाला. त्यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी जनतेचे कधीही भरून न निघणारे असे मोठे नुकसान झाले आहे.एक निर्भीड पत्रकार,संपादक म्हणून त्यांचे नावलौकिक होते.अगदी कमी कालावधी मध्ये त्यांनी दैनिक सम्राट उभा केला आणि अख्या महाराष्ट्रात दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचे मोठे कार्य केले.आंबेडकरी चळवळीला ताकद देण्याचे काम त्यांनी केले.
आशा या हुशार,प्रतिभावंत पत्रकार,संपादक म्हणून निर्भिडपणे आपली पत्रकारिता करणाऱ्या संपादकास कंधार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या ठिकाणी समाज बांधवांकडून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस एन.एन.कांबळे,कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे,शहराध्यक्ष निलेश गायकवाड, आर.एन.गायकवाड,आनंदराव कांबळे,एन.के.ढवळे,सुदाम मोडके,सदाशिव गायकवाड,संतोष आगबोटे,अनिल सुर्यवंशी,सु.द.घाटे,नाना गायकवाड,रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अॅड.मारोती सोनकांबळे,ड्रायवर संघटनेचे अध्यक्ष माधव कांबळे,आपचे तालुकाध्यक्ष साईनाथ मळगे,दिलीप जोंधळे,अॅड.यु.पी.वाघमारे,प्रदिप पांगरीकर,संजय कदम, अमोल कांबळे अविनाश कंधारकर,रूपेश कांबळे,पत्रकार दिगांबर गायकवाड,एन.डी.जाभाडे,भुजंग सोनकांबळे,मुरलीधर थोटे, बी. सी. कांबळे,प्रल्हाद आगबोटे ,सुभाष वाघमारे,सिध्दार्थ वाघमारे,संभाजी कांबळे,आदींची उपस्थिती होती.