नांदेड ; खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून श्रीनगर पर्यंतची पदयात्रा पूर्ण करणारे नांदेड जिल्ह्यातील एकमेव भारतयात्री डॉ. श्रावण रापनवाड यांचे आज नांदेड जिल्हा ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेसचे कमिटीच्या वतीने जल्लोशात स्वागत करण्यात आले.
गेल्या ३० तारखेला श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेचा समारोप झाल्यानंतर डॉ. श्रावण रापनवाड आज दुपारी दिल्ली मार्गे सचखंड एक्सप्रेसने नांदेडला परतले. याप्रसंगी नांदेड रेल्वे स्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये प्रामु्ख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,
प्रदेश काँग्रेस सचिव अॅड. सुरेंद्र घोडजकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव बेटमोगरेकर, संभाजी भिलवंडे, नारायण श्रीमनवार, मुखेड तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष जे.पी. पाटील, सरचिटणीस नवीन राठोड, अरूणाताई पुरी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय देवडे, मुखेड विधानसभेचे युवक अध्यक्ष संतोष बोनलेवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद सोळंके, मुदखेडचे माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, स्वस्त धान्य दुकानदार सेलचे अध्यक्ष येडके यांच्या अनेक पदाधिकारी, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुखानंद पुरी, शहराध्यक्ष हरजिंदरसिंग संधू यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.