गेली बरेच वर्षांपासून लोहा येथिल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त स्वरूपात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलापासून, आदिलशहा पासून, पोर्तुगीज, डच, फिरंगीज इत्यादी हुकूमशहापासून रयतेला मुक्त केले. परंतु प्रशासन आणि राजकारण्यांच्या निरर्थक कामगिरीने लोहा येथील महाराजांचा पुतळा बंदिस्त आहे.
गेली अनेक वर्षांपासून अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी आहे कि महाराजांचा पुतळा सन्मानाने बसवावा. परंतु या मागनीचा विचार काही केल्या होत नाही. या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग यावी म्हणुन अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून 19 फेब्रुवारी 2023रोजी पर्यंत राजांचा महाराजांचा पुतळा बसवावा अन्यथा 20 फेब्रुवारी 2023पर्यंत सकाळी 12:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा येथे आत्मदहन करणार असे निवेदन श्री राम पाटील आनकाडे अखिल भारतीय छावा संघटना जिल्हा उपाध्यक्ष नांदेड , संदीप पाटील तोंडचिरे(अखिल भारतीय छावा संघटना तालुका उपाध्यक्ष कंधार यांनी दिले .
या निवेदनाच्या प्रति राज्यचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , जिल्हयाचे पालकमंत्री ,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , आमदार श्यामसुंदर शिंदे , जिल्हा अधिकारी नांदेड , तहसीलदार लोहा यांना देण्यात आले .