कंधार ;
आज दि:-09/02/23 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली कंधार ग्रामीण रुग्णालयात भव्यदिव्य महारक्तदान शिबिर आणि सर्वं रोग निदान शिबिर, “जागरुक पालक सुदृढ बालक” कार्यक्रम घेण्यात आले .
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.अनुपकुमार यादव सर तहसीलदार (IAS,)अधिकारी कंधार यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तसेच प्रथमतः वैद्यकीय क्षेत्रातील देवता धनवंतरी देवतांची पूजा व महामानवाना अभिवादन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे फळवाटपाचा कार्यक्रम व दवाखान्यातील रुग्णासाठी पॅड येथील अभिवक्ता मारोतीरावजी पंढरे साहेब
(जिल्हा उपप्रमुख शिवसेना) यांनी केले व त्यांच्यासोबत कंधार तालुका वसंत निलावार( तालुका उपप्रमुख),श्रयेश लाटकर (कंधार युवासेना शहर प्रमुख ),मोहन जाधव बाळांतवाडी (सरपंच ),सचिन श्रीगणवाड, कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.महेश पोकले ,डॉ.संतोष पदमवार,डॉ.रुजू टोम्पे,डॉ.दत्तात्रेय गुडमेवार,श्रीमती शीतल कदम अणि त्यांचा स्टाफ, अशोक दुरपडे, पांचाळ, अरविंद वाटोरे व ईतर कर्मचारी हजर होते .जवळपास 42 रक्ताच्या बॉटल संकलन करण्यात आले.
शिवाजी हायस्कूल कंधार येथे 100 जनाची बालआरोग्य तपासणी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी कंधार येथील तहसीलदार मा.अनुपसिह यादव सर (IAS) व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर सर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले .
सोबत तालुका आरोग्य अधिकार, ,गटशिक्षणाधिकारी प्रतिनिधी श्री.एस.आर.कनोजवार ,
श्री.मलगीरवार सर,ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले, डॉ.श्रीकांत मोरे, व आर बी एस के टीम, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एस.आर.आंबटवाड , प्रदीप पांचाळ , दिलीप कांबळे प्रसिद्धी माध्यम, आदी.. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व 0 ते 18 वर्षे वयातील बालकांनी तपासणी करून घ्यावी असे संदेश दिले.
कंधारचे तहसीलदार मा.अनुपसिह यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शाहीन बेगम यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचलन श्री.एस.आर.कनोजवार सर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.श्रीकांत मोरे सर यांनी केले .