कंधार येथील सुप्रसिध्द सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम रहे. यांचा ७०८ वा उर्स दि ८ फेब्रुवारी रोजी संदल मिरवणुक सायंकाळी ५ वाजता नमाज पठणा नंतर दर्गाहचे सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दिन हुसैनी व मुतवल्ली सय्यद शहा मुजतबा हुसैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत फातेहाखानी नतर संदल मिरवणुकीची सुरुवात झाली. या उससाठी राज्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या सह अनेक राज्यांतून भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी उर्स कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन बाहोद्दीन यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी संय्याह सरवरे मगदूम रह. यांच्या ७०८ व्या उर्सा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संदल मिरवणूक तलाव कट्टा, जुनी नगरपालिका लुंगार गल्ली गांधी चौक मार्गानि शांततेत पार पडली. संदल मिरवणूक असरच्या नमाज पठणा नंतर फातेहाखानी करून संदल मिरवणुकीची सुरुवात झाली होती. या वेळी उसा निमित्त आलेल्या भक्त भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी आ. श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, मा जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ पुरुषोत्तम धोंडगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, तालुका प्रमुख बालाजी पांडागळे, माजी नगराध्यक्ष रामराम पवार, स्वप्नील पाटील लुंगारे, नगरसेवक शहाजी नळगे , रामभाऊ बनसोडे, सुधाकर कांबळे, प्रफुल्ल बडवणे, राजकुमार केकाटे, रमेशसिंह ठाकुर, चेतनभाऊ केंद्रे, निलेश सिंह गौर, दत्ता पा. शिंदे.ड हनुमंत कुट्टे, अजय मोरे, राजहंस शहापुरे, मधुकर पा. डांगे महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रसादाचे वाटप , दुपारी २ वाजता कुसत्यांची दंगल व संध्याकाळी ८ वाजल्यापासून कव्वालीचा कार्यक्रम होणार असून यात टि व्ही स्टार समिर हयात (दिल्ली) शाहिन सबा (झारखंड) टि व्ही स्टार चा मुकाबला होणार आहे. दि १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ पासून कुल हिंद मुशायरा (हास्यकवी संमेलन) ज्यामध्ये नामांकित कवी सहभाग घेणार आहेत. या उसाचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान उरूस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद जफारोद्दीन यांनी केले आहे .