आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते ढगे पिंपळगाव येथे ९१लक्ष रु कामाचे उद्घाटन

लोहा/ प्रतिनिधी

तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे गुरुवारी जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाचे उद्घाटन लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, उपसभापती शाम अण्णा पवार ,सरपंच बालाजी पाटील ढगे, उपसरपंच किशनराव ढगे, धनाजी मामा, माजी सरपंच संतोष पाटील प्रमुख उपस्थित होते,

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाली की ढगे पिंपळगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी निधीची कदापी कमतरता भासू देणार नसून आगामी काळात ढगे पिंपळगाव मधील विविध विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले,

यावेळी संचालक सुधाकर सातपुते, तुकाराम पाटील ढगे, शुभम कदम, सचिन कल्याणकर सह कृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शिंदे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य योजनेचा शुभारंभ शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा येथे आयोजित कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य योजनेचा शुभारंभ आमदार शामसुंदर शिंदे यांचे हस्ते करण्यात आला, पिक विम्याच्या उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी यावेळी आमदार शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली यावेळी कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आमदार शिंदे यांना बोलताना सांगितले की लोहा कंधार मतदार संघातील उर्वरित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असून नांदेड जिल्ह्यात लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीचा पिक विम्याची रक्कम लवकरच मिळणार असल्याचे सांगितले यावेळी कृषी विभागाचे कृषी सहसंचालक दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपसभापती श्याम अण्णा पवार, कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार, कृषी अधिकारी अरुण घुमणवाड सह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *