विधवा महिला होमगार्ड यांना कन्येच्या विवाहासाठी २० हजारांची मदत

नांदेड – कंधार पथकातील विधवा महिला होमगार्ड श्रीमती शारदा सूर्यवंशी- कदम यांच्या मुलीच्या विवाहासाठी होमगार्ड अधिकारी व जवान यांनी आज शुक्रवारी २० हजार रुपायांची आर्थिक मदत केली.

महिला होमगार्ड श्रीमती शारदा सूर्यवंशी- कदम यांचे पती सुनिल सूर्यवंशी यांचे फेब्रुवारी २०२२ मध्ये निधन झाले. त्यांच्या मुलीचा विवाह येत्या २९ जानेवारी रोजी होणार आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची जाणीव असल्यामुळे कंधारचे समादेक अधिकारी बालाजी डफडे यांनी पुढाकार घेऊन होमगार्ड अधिकारी व जवान यांनी स्वः ईच्छेने आर्थिक मदत करावी अशी संकल्पना मांडली. लगेच १५ हजार रुपायांचा निधी जमा झाला. सदरील रक्कम त्यांना आज सुपूर्द करण्यात येणार होती. या बाबीची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अबिनाश कुमार यांनी स्वःत पाच हजार रुपयांची मदत देऊन जिल्ह्यातील सर्व होमगार्ड यांचे पालक असल्याचे आपल्या कृतीतून दाखऊन दिले. सर्व होमगार्ड यांच्या सुःख, दुःखात आपण सदैव सहभागी असल्याची जाणीव निर्माण करून दिली.

अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक मा. श्री.अबिनाश कुमार (भा. पो. से.) यांच्यारुपाने कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय त्याच बरोबर माणुसकीचा जिवंत झरा असलेले प्रेमळ व मायाळू नेतृत्व लाभल्याची भावना उपस्थित होमगार्ड अधिकारी व जवान यांनी व्यक्त केली.
सदरील रक्कम श्रीमती शारदा सूर्यवंशी- कदम यांना होमगार्ड जिल्हा कार्यालयात सुपुर्द करण्यात आली.

या वेळी प्रशासिक अधिकारी भगवान शेट्टे, केंद्र नायक अरुण परिहार, कंधारचे समादेशक अधिकारी बालाजी डफडे, नांदेडचे समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, पलटन नायक गुंडेराव खेडकर, पलटन नायक बळवंत अटकोरे, महिला होमगार्ड द्रोपदा पवार, मिरा कांबळे, सारिका सोनकांबळे, निर्मला वाघमारे यांच्यासह महिला व पुरुष होमगार्ड यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *