कंधार ; प्रतिनिधी
तहसिल कार्यालय कंधार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली..यावेळी महाराष्ट्र राज्य गीत..जय जय महाराष्ट्र माझा चे सामुहिक गायन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. डॉ.शरद मंडलिक (उपविभागीय अधिकारी कंधार) यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या हस्ते व तहसिलदार कंधार अनुपसिंह यादव (परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व सर्व उपस्थितांना प्रतिमेत पुष्प अर्पण केले.
यावेळी नायब तहसीलदार संतोष कामठेकर , निवासी नायब तहसीलदार राजेश पाठक,पेशकार अविनाश पानपट्टे, मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगांवकर,वाघमोडे,
बारकुजी मोरे , तलाठी राजेश बरोडा,नारमवाड,मन्मथ थोटे सह अधिकारी कर्मचारी व नागरीकांची उपस्थिती होती .