फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
अठरा पगड जाती-धर्माला एकत्रित घेऊन मावळे ही समान पदवी देत पर नारी ला मातेसमान दर्जा देण्याची शिकवण देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त फुलवळ येथे ठिकठिकाणी प्रतिमेचे , पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच चौकाच्या चबूतऱ्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चबुतरा जमीनदोस्त झाला होता . परंतु त्याच ठिकाणी नव्याने चबुतरा उभारण्यात यावा अशी अनेक बांधवांची इच्छा होती. तेंव्हा त्याच ठिकाणी नुकताच नव्याने डौलदार चबुतरा उभारून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा फलक लावण्यात आला याच ठिकाणी आज शिवजयंती सोहळा पार पडला.
यावेळी सरपंच सौ. विमलबाई नागनाथराव मंगनाळे , विठ्ठलराव बोरगावे , गिरीधर पोतदार , बसवेश्वर मंगनाळे , माजी सरपंच बालाजी देवकांबळे , दत्ता डांगे , गंगाधर शेळगावे , ग्राम पंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते , परमेश्वर डांगे , मंगेश पांचाळ , कैलास बसवंते , सादख शेख ,रज्जाक मोमीन , नारायणराव बोरगावे , महेश मंगनाळे , विजय सदलापुरे , विकास पवार , रंगनाथ पांचाळ , सौरभ बोरगावे ,गजानन डांगे , दिलीप सोमासे , सुनील जेलेवाड , बालाजी तेलंग , गणेश मंगनाळे , किशोर सोमासे , लक्ष्मण वडजे , आनंद जाधव , राजू सोमासे , अंगद सोमासे , अक्षय पवार ,सह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तसेच येथीलच श्री बसवेश्वर विद्यालय शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध वेशभूषा धारण करून मुलांनी देखावे सादर करून रयतेच्या राजाला अभिवादन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक , सह शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी उपस्थिती होते. तर ग्राम पंचायत कार्यालय , जि.प. केंद्रीय प्रा. शाळेतही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.