श्री गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी दिला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांना शुभाशीर्वाद

नांदेड ;

 लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे कोरोना ला हरवुन घरी परतले त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नांदेड येथिल साई सुभाष निवास वसंतनगर  येथे मिनि पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज चे मठाधीपती  श्री गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांना शुभाशीर्वाद  शुभाशीर्वाद दिला.


खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कोरोना  काळामध्ये सर्वसामान्य जनतेची तळागाळात जाऊन सेवा केली. त्यामुळे कोरोणाचा संसर्ग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना झाल्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात होती, त्याचाच भाग म्हणून तालुक्यात व जिल्ह्यात गावागावांमध्ये मंदिरात आरत्या, प्रार्थना करून खासदार प्रताप पाटील चिखलीकर बरे व्हावेत म्हणून  प्रार्थना  करण्यात  आली होती.तसेच ठिकाणच्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यात आल्या होत्या.

 खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आता कोरोनावर मात करून आले असून जनतेच्या  समाजसेवेसाठी पुन्हा कार्यरत झाल्याने मिनी पंढरपूर  म्हणून ओळखल्या  जाणारे कंधार तालुक्यातील गुरुदेव संत नामदेव महाराज संस्थान उमरज चे मठाधीपती  श्री गुरु एकनाथ नामदेव महाराज तब्यतेची विचार पुस करण्यासाठी भेट दिली व आशीर्वाद दिला.यावेळी श्री गुरु एकनाथ नामदेव महाराज  यांचा सत्कार करून आशिर्वाद घेतले . खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व पत्नी सौ प्रतीभाताई चिखलीकर , सुनबाई सौ वैशालीताई चिखलीकर आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *