नीटआणि जेईई परीक्षांचा (अ)निट गोंधळ

नीट आणि जेईई परीक्षांबाबतचा गोंधळ आता संपला आहे. गेली काही महिने हा गोंधळ सुरूच होता. तो आणखी लांबला जाऊ शकत होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो थांबवला. केंद्र सरकार आणि काही विद्यार्थी,पालक परीक्षा‌ घेण्याबाबत आग्रही आहेत. परंतु काहींना परीक्षा आत्ताच नको आहेत. त्यासाठी कोरोनाचे कारण पुढे आहेच.‌ यावरून राजकारणही तापले होते. कोणत्याही परिस्थितीत आता ह्या परीक्षा होतीलच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


बारावी बोर्डाचा निकाल लागल्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतली जाणारी नीट आणि आयआयटी तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई ह्या दोन्ही प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. ह्या वेळापत्रकानुसार १ ते ६ सप्टेंबर दरम्यान जेईई मेन परीक्षा तर १३ सप्टेंबरला नीट परीक्षा घेतली जाणार असे जाहीर करण्यात आले. परंतु कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेतल्या जावू नयेत, त्याकाही काळ पुढे ढकलण्यात याव्यात याकरीता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोरोना काळात ही परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना नीट आणि जेईई घेणे धोक्याचे ठरू शकते, असं याचिकेत म्हटलं होतं. कोरोनामुळे ही परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु १७ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये या करीता परीक्षा ह्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील असा निर्णय दिला. नीट परीक्षेसाठी १५,९७,४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात ११ विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती. 


जेईई आणि नीटची परीक्षा होणार की नाही या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण नीट आणि जेईई परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. यासंदर्भात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परीपत्रक जारी केलं आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं. मात्र या निर्णयानंतर आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

source

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आहे. कोर्टाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांनी देशातील अनेक राज्यात आंदोलने केली होती. या निकालानंतरही देशात विद्यार्थी-पालकांकडून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील तसेच बिगर भाजप राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांमध्ये जेईई व नीट परीक्षा घेणे शक्य नसून त्या पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे फेरविचार याचिका करावी, अशी सूचना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत मांडली होती. सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना केली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी झाले होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की परीक्षा घ्यायला हव्यात पण परिस्थितीती सुधारल्यानंतर. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७०००मुलांना कोरोनाची लागण झाली होती. जर आपल्याबाबत अशी परिस्थिती ओढावली तर काय करणार?

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आणि परीक्षा घेण्याकरीता विद्यार्थ्यांचा असलेला विरोध लक्षात घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी सर्व विरोधी पक्षांची व्हर्चुअल बैठक बोलावली. या बैठकीत परीक्षा घेण्यास विरोध दर्शवणाऱ्या राज्यातील प्रत्येकी एका मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात नीट आणि जेईई परीक्षांबाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्या सहा राज्यात विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या राज्यातील प्रत्येकी एका मंत्र्यांनी एक सामायिक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. या सहा मंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा देखील समावेश आहे. दाखल केलेल्या याचिके संबंधी माध्यमांनी प्रश्न विचारला असता मंत्री उदय सामंत यांनी, आम्ही एक सुजाण आणि जबाबदार नागरिक या नात्याने ही याचिका व्यक्तिगत पातळीवर दाखल केली आहे असे आवर्जून नमूद केले. 

सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई परीक्षांबाबत घेतलेल्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करताना ही राज्य याचिकेत म्हणतात की, ह्या परीक्षांना देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात त्यामुळे कोरोना महामारीकाळात विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी सध्या परीक्षा न घेणेच उचित ठरेल. तसेच परीक्षेला येणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या प्रवासाची, निवासाची सुरक्षित सोय करणे हे सध्या परिस्तिथीत फार कठीण काम आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती सहा राज्यातील मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.


जेईई मेन आणि नीट परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांनी आव्हान दिलं आहे. या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रासह प. बंगाल, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या काँग्रेसशासित तसेच बिगरभाजप राज्यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नीट, जेईई मेन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

source


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून केंद्र सरकार विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूनच घेत नसल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.27) जेईई- नीट या दोन्ही परीक्षांच्या ॲडमिट कार्डची होळी केली. तसेच परीक्षा आयोजित केल्यास आम्ही त्या उधळून लावू असा इशारा एनएसयुआय संघटनेने दिला आहे.


कोरोना बधितांची संख्या वाढत असतानाही केंद्र सरकार जेईई आणि नीट या परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळायचे आहे काय, असा सवाल करत महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसकडून (एनएसयुआय) राज्यभरात केंद्राच्या भूमिकेविरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने आपली भूमिका  कायम ठेवली तर आम्ही परीक्षा केंद्रावर जाऊन या परीक्षा उधळून लावू असा इशारा एनएसयुआयचे प्रदेश अध्यक्ष अमिर शेख यांनी दिला.  

देशात कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी देशभरातील विविध राजकीय पक्ष, संघटना, आणि विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. राज्यात कोरोनाचा कहर सर्वाधिक असल्याने यासाठी राज्य सरकारने नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे जेईई-नीट या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरावही संमत करण्यात आला आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण‍ यांनी गुरुवारी एक ट्वीट करून कोरोना अजून आटोक्यात आला नसल्याने जेईई-नीट या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी करण्यात येत असलेली मागणी अतिशय रास्त आहे. यामुळे केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात फेरविचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जेईई व अन्य परीक्षा घेण्याच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये मुंडे यांनी म्हटले आहे की देशभरात कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोनाशी लढताना सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. या कोरोना काळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये क्वारांटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी हे सध्या कोरोनाशी लढत आहेत. भाजप वगळता अनेक राजकीय पक्षांनी परीक्षा पुढे ढकलण्याचीच मागणी केली आहे. जेईई आणि नीट परीक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसनं  राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.  परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा हट्ट सोडावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात जेईई आणि नीट विद्यार्थी यांच्या परीक्षा बाबत चांगले रान तापले आहे.जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांची नीट आणि जेईई परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी भेट घेतली.आणि परीक्षा देत असताना कोरोनाच्या काळात किती अडचणी येणार आहेत यांची सविस्तर माहिती दिली.शेवाळे यांनी कोणताही विलंब न लावता देशाचे माजी पंतप्रधान मा.देवेगौडा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.जेईई आणि नीट विद्यार्थी यांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची परस्थिती सांगितली.कोरोनाच्या काळात परीक्षा घेतली तर लाखो विद्यार्थी आणि पालक एकत्र येथील.आणि भयंकर परस्थिती उदभवू शकते.त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली. 


 देशातील १७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट परीक्षांचे प्रवेश पत्र डाऊनलोड केले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हायला हवी आहे, हेच यातून स्पष्ट होते.  नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  ७ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सचे अॅडमिट कार्डतर १० लाखांवर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड केले आहे. यातूनच हे दिसून येतं की विद्यार्थ्यांना परीक्षा कोणत्याही किंमतीवर हवी आहे. ज्या पालकांना परीक्षा व्हावी असे वाटत आहे, अशा पालकांचे ई-मेलही केंद्र सरकारला आले आहेत. आमची मुलं गेली दोन-तीन वर्षे या परीक्षांचा अभ्यास करताहेत, त्यामुळे या परीक्षा व्हायला हव्यात असे या पालकांचे म्हणणे आहे. यावरून पालक आग्रही असल्याचे दिसून येते. 

नीट तसेच जेईई परिक्षा देणारे विद्यार्थी दोन वर्षे रोज बारा तास अभ्यास करीत आहेत दरवेळी परिक्षा लांबवण्याचा निर्णय होतो, त्यावेळी त्यांच्यात नैराश्य होते. त्यांचे आता अभ्यास करताना पूर्ण लक्ष केंद्रीत होत नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. दोन्ही परिक्षा लॉकडाऊन असतानाही घेता येईल. त्यावेळी या परिक्षेस सामोरे जाणाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात यावी. त्यावेळी लॉकडाऊनची देशभरात कठोरपणे अंमलबजावणी होईल, त्याचबरोबर सुरक्षित अंतराचे पालन होण्यासाठी जास्तीत जास्त शाळा तसेच महाविद्यालयात ही परिक्षा घेण्यात यावी. त्याचबरोबर या परिक्षेस येणाऱ्यांची चाचणी करण्यात यावी अशी सूचना पालकांनी केली आहे. 

देशातील आणि परदेशातील विविध विद्यापीठातून सुमारे १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेईई-नीट परीक्षांसंदर्भात पत्र लिहिले आहे. नीट आणि जेईई परीक्षांना आणखी विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल, अशी चिंता या शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या परीक्षांना देशभरात विविध राजकीय पक्षांकडून विरोध होतो आहे. काही राज्यांचाही या परीक्षा कोविड-१९ काळात घेण्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर या पत्रात असं म्हटलंय की, ‘काही जण स्वत:चे राजकीय हित साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. तरुण आणि विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. कोविड-१९ महामारीमुळे त्यांच्या करिअरवरही संकटाचे ढग आहेत. प्रवेश, वर्ग याबाबतच्या सर्व समस्या लवकरात लवकर दूर व्हायला हव्यात, असं या पत्रात म्हटलं आहे.


दरवर्षीप्रमाणे, यंदाही लाखो विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, आणि आता पुढे काय होणार याची वाट पाहत घरी बसले आहेत, असंही यात लिहिलं आहे. जेईई मेन आणि नीट परीक्षा आयोजित करण्याचे सरकारने ठरवले आहे. मात्र यात आणखी विलंब झाला तर विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जाईल. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी कोणत्याही किमतीवर तडजोड केली जाऊ नये, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.प्रवेश परिक्षा लांबणीवर पडल्यास विद्यार्थी तसेच पालक जास्त निराश होतील, त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष द्यावी अशी विनंती काही पालकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांना केली आहे. 

एनटीएने मात्र परीक्षेची जय्यत तयारी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, जेईई (मेन) आणि नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे. ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षार्थींसाठी आरोग्यच्या सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ६६०० लिटर हॅंड सॅंनिटायझर इत्यादी गोष्टी सुमारे १३ कोटी रूपये खर्च करून घेतल्या आहेत.त्याशिवाय ६६०० स्पंज, ३,३०० स्प्रे बाटल्या विकत घेण्यात आल्या असून, परीक्षेच्या दिवसांत ३,३०० स्वच्छता कर्मचारी परीक्षा केंद्रांवर सज्ज असतील. जेईई (मेन) या परीक्षेला सुमारे ८.५८ लाख विद्यार्थी बसणार असून, तिथे १.१४ लाख जण पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी जेईई (मेन) आणि नीट परीक्षांच्या दर ३० परीक्षार्थींमागे २ पर्यवेक्षक ठेवण्यात आले होते. आता हेच प्रमाण १५ परीक्षार्थींपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. आता पर्यवेक्षकांची संख्या वाढवून ती १.४ लाख करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळी २० मिनिटांच्या कालावधीत किमान ४० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल. उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार त्यांना पहिलेच केंद्र देण्याचा ९९ टक्के प्रयत्न करण्यात येईल, असेही ठळकपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

source

जेईई मेनसाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आधी ५७० परीक्षा केंद्रे होती, ती आता ६६० करण्यात आली आहेत. नीटसाठी देखील परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६ वरून वाढवून ३,८४३ करण्यात आली आहेत. जेईई ही संगणकीकृत परीक्षा असून नीट ही पेन-पेपर परीक्षा आहे. जेईई मेन परीक्षेला प्रति सत्र विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली आहे. आधी प्रति सत्र १ लाख ३२ हजार विद्यार्थी देशभरात या परीक्षेला एका वेळी बसवण्यात येणार होते. ही संख्या आता कमी करून ८० हजारांवर आणण्यात आली आहे. परिणामी सत्रांची संख्या ८ वरून १२ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एनटीएने दिली आहे. जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. त्यासाठीच्या पायाभूत सोयी, विद्यार्थ्यांची सुरक्षा, अंतराचे पालन व इतर निकष पाळून या परीक्षा जास्तीत जास्त सुरक्षित करण्याबाबतचा विचार झाला आहे.‌ तसेच विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे


कोविड-१९ ची प्रकरणे वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी जोर धरत असतानाच, या परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या ‘नीट’ व ‘जेईई’ या परीक्षा घेण्यास आणखी उशीर करण्याची परिणती हे शैक्षणिक वर्ष निर्थक ठरण्यात (झिरो अकॅडेमिक इयर) होईल, तसेच या महत्त्वाच्या परीक्षांना एखादा जलद पर्याय शोधण्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावून त्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात. कोरोना महासाथीने आधीच अनेक विद्यार्थी व संस्थांच्या शैक्षणिक योजना विस्कळीत झाल्या आहेत आणि हा विषाणू लवकर जाईल असे दिसत नाही. आपण हे शैक्षणिक वर्ष निष्फळ ठरू द्यायला नको‌ आहे कारण त्याचा अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.या परीक्षांची त्यांच्या गुणवत्तेसाठी जागतिक कीर्ती असून, त्या जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानल्या जातात. त्यांना एखादा जलद पर्याय शोधणे हे नक्कीच या परीक्षा देण्याइतके समाधानकारक ठरु शकत नाही. 


यूपीएससी, एनडीएची परिक्षा याच सुमारास होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणाकडून पुन्हा एकदा जेईई तसेच नीटची परिक्षा लांबणीवर टाकणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता हेच थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यासाठी ऑनलाईन आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईसह देशभरातील एक हजारहून जास्त पालक, विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी याद्वारे राज्य सरकार, शिक्षण मंत्रालय तसेच राष्ट्रीय चाचणी प्राधीकरण  आधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. कोरोनाकाळात जनजीवन अस्तव्यस्त होत असतांना देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न झाले. विविध आस्थापनांना हळूहळू सूट देण्यात आली. व्यायामशाळा, शाळा, मंदिरे उघडण्यासाठीची मागणी होत आहे. कोरोनासह जगत असतांना परीक्षेचा बागुलबुवा करु नये. योग्य काळजी घेतली तर परीक्षा होऊ शकतात. परीक्षा ह्या झाल्याच पाहिजेत.‌

या फारच गाजलेल्या परीक्षांसाठी सर्वच उमेदवारांना युगसाक्षीतर्फे हार्दिक शुभेच्छा….!

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE

गंगाधर ढवळे ,नांदेड 
संपादकीय   / ३०.०८.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *