२७ रोजी कंधार येथे संत सेवालाल महाराज जयंती सोहळा व भव्य शोभा यात्रा

 

कंधार ; राष्ट्रसंत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २७ फेब्रुवारी कंधार शहरांमध्ये भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती च्या वतीने करण्यात आले असून या जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने बंजारा बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीराम जाधव यांनी केले .

बंजारा समाजाचे क्रांतिकारी धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांच्या २८४ वी जयंती निमित्त कंधार शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे निमित्ताने श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा दिनांक २७ रोजी मायेचे मंदिर साठे नगर येथून सकाळी ११ वाजता निघेल व शहरातील मुख्य रस्त्याने ही शोभायात्रा निघून शिवरामजी पवार मंगल कार्यालय घोडज रोड कंधार येथे याचा समारोप होणार आहे.

यावेळी श्रीक्षेत्र पोहरागड चे गादीपती महंत परमपूज्य बाबू सिंग महाराज यांच्या हस्ते भोगविधी व आशीर्वचन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कंधार- मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड तर उद्घाटक म्हणून विधान परिषद सदस्य आमदार निलेय नाईक हे राहणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती माजी खासदार हरिभाऊ राठोड, बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड, तहसीलदार विजय चव्हाण, सेवानिवृत्त मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड ,नारायणराव जाधव, डॉ मोहन चव्हाण, बंजारा क्रांतीला चे प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड, नगरसेवक श्रीनिवास जाधव, माजी सभापती रामचंद्र राठोड, सुंदर सिंग जाधव,सुनील जाधव, अशोक चव्हाण ,विनोद जाधव ,लक्ष्मण जाधव, संजय राठोड ,पंडितराव आडे ,देविदास राठोड ,पांडुरंग पवार ,साईनाथ पवार ,गणपतराव जाधव ,अड बालाजी राठोड, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून डॉ संजय पवार हे राहणार आहे ,भव्यअशा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीराम जाधव ,संयोजक अध्यक्ष भगवान राठोड ,कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण ,सचिव माधव जाधव ,कार्यवाहक भगवान जाधव ,उपाध्यक्ष सुनील राठोड ,सचिन जाधव ,जगदीश राठोड, सहसचिव सुधाकर राठोड, आनंद राठोड, सचिन जाधव ,कोषाध्यक्ष सुधाकर पवार ,सहकोशाअध्यक्ष विश्वनाथ पवार ,प्रवीण पवार ,सहकार्यवहाक जयपाल चव्हाण ,संगमेश्वर राठोड ,मिरवणूक प्रमुख सुरेश राठोड यांच्या सह कर्मचारी, नायक कारभारी यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बंजारा समाजातील माता-भगिनींनी व उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *