मराठी भाषा व तिचे अस्तित्व ….!(मराठी राजभाषा दिन विशेष )

“जैसे दीपामाझी दिवटी , का तिथीमाझी पूर्णिमा गोमटी
तैसे भाषामध्ये म-हाटी ,सर्वोत्तम !!
तिर्थामध्ये काशी, व्रतामध्ये एकादशी
भाषामध्ये तैशी, म-हाटी शोभिवंत !!!
ज्ञानेश्वर महाराज….
आजचे युग हे माहिती तंञज्ञानाचे युग आहे.मोबाईल हातात घेऊन जगाशी संवाद साधणा-या तरुण पिढीकडुन मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी फार आपेक्षा आहेत.संगणक आणि इंटरनेट मोबाईल वापराने जग फार जवळ आले. एस.एम.एस.ट्विटर ,आर्कुट ,फेसबुक ,ब्लाग ईत्यादी माध्यमातून आपण खूप प्रगती केली.पण मराठी भाषा वाढविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करत आहोत .विविध क्षेत्रातील मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्ता पूर्ण व्हावा आणि मराठी भाषेच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी यासाठी काम करणाऱ्या शासकीय आणि अशासकीय संस्थामध्ये समन्वय निर्माण करुन भाषा विकासाच्या दृष्टीने राज्यभर एक आश्वासक स्वरुपाचे वातावरण आपण सर्वांनी केले पाहिजेत
मराठी साहात्याला नवे वैभव प्राप्त करुन देणारे महान कवी व साहित्यिक ,ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जयंती दिन जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केलाजातो..
शासनाने मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरु केला आहे, भाषासंचानालय ,राज्य मराठी विकास संस्था ,विश्व कोश निर्मिती मंडळ ,आणि साहित्य संस्कृती मंडळ या सा-या संस्था आता मराठी भाषा विभागाच्या छञाखाली आल्या पाहिजे ,जागतिक पातळीवरील विविध क्षेत्रातील घडामोडींची अद्ययावत माहिती आणि ज्ञान मराठीत उपलब्ध व्हावेत या उद्देशाने “विश्वकोश प्रकल्प राबविण्यात यावा हे सर्व कोश “युनिकोड”मध्ये आणुन जगाच्या पाठीवरील सर्वच राज्याच्या शासकीय कार्यालयात उपलब्ध करुन द्यावेत .राज्य मराठी विकास संस्थे मार्फत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश व सुची तयार करुन मराठी भाषेचा दर्जा व दबदबा वाढविण्यासाठी मी मराठी व माझी भाषा मराठी या ओळीचा वापर प्रत्यक्ष शासकीय कामकाजात केला पाहिजे .
भाषा ही विचारांच्या अभिव्यक्तीचे साधन आहे,विकिपेडीया सारख्या जगमान्य इंटरनेट माहिती कोशाने मराठीचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा,,
शिवकाल….१६७४
छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर त्यांच्या प्रधानमंडळापैकी रघुनाथ पंत यांच्याकडून राज्य व्यवहार कोश तयार करुन मराठी भाषेला वैभव प्राप्त करुन दिले.(छञपती शिवारायांनी पाठविलेला मराठी भाषेतील शासकीय आदेश.या शासकीय पञाची लिपी मोडी असुन शेवटच्या ओळीतील “लेखन सीमा” ही अक्षरे श्री शिवछञपतींची आहेत.शिवचरित्र साहित्य ,खंड१२,लेखांक ८६..
साहित्य ….,
१८१७ मध्ये ईंग्रजी पुस्तकाचा पहिला मराठी अनुवाद प्रकाशित झाला.१८३२ मध्ये बाळशास्ञी जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपञ”दर्पण”सुरु करुन मराठी भाषेला ऊर्जित आवस्था प्राप्त करुन दिली.असे मराठी वृत्तपत्रे सर्व कार्यालयात सरकारने मोफत वितरण करायला हवेत.बाबा पदमजी यांची “यमुना पर्यटन” १८५७ मराठीतील पहिली कादंबरी ठरली.अश्या मराठी कादंबऱ्या सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विकत घेण्यासाठी सरकारने अनुदान द्यावेत.कारण भाषा हे विचारांचे आदानप्रदान करण्याचे माध्यम आहे.आणि मातृभाषा हे सुलभ साधन आहे.लोकमान्य टिळकांनी “गीतारहस्य “मराठीततुन लिहुन मराठी भाषेचे प्राबल्य वाढविले.कारण भाषा जिवंत ठेवणे हे जिवंत सस्कृतीचे प्रतिक आहे.
जनतेची भाषा..
जनतेचा शासनाशी सर्व बाजुंनी असा घनिष्ठ संबंध येत असल्यामुळे जनतेची भाषा हीच शासनाची भाषा असायला पाहिजे .लोकशाही विचारसरणी नुसार राजकीय ऊदिष्टांच्या पूर्तीसाठी जनता व शासक वर्ग यांच्या विचार,भावना एक असल्या पाहिजे, समाजातील निरनिराळ्या व्यक्तींना एकञ आणण्याचे भाषा हे एक माध्यम आहे,आजची प्रशासकीय भाषा ही केवळ सामान्य स्वरुपाच्या कार्यालयीन पञव्यवहारापुरती व टिप्पणी लेखनापूरती किंवा जनतेसाठी काढण्यात येणाऱ्या सुचना व प्रसिद्धी पञके यांच्या पुरती मर्यादित न राहता प्रशासनाच्या सर्वच कक्षेतील विषय मराठी भाषेत व्हावेत यासाठी १९५०-५१ साली शासनाने शास्त्रीय परिभाषा मंडळ स्थापन केले.१९६० साली या मंडळाची व्याप्ती वाढवुन “शास्ञीय व तांत्रिक परिभाषा आयोग असे केले.गरज आहे ती फक्त प्रचंड ईच्छा शक्तीची .माझी मराठीची.
फादर स्टिफन्स म्हणतो,,,
“पाखियांमध्ये मयोरु.ब्रुखियामध्ये कल्पतरु..
भाषामध्ये मानु थोर.मराठियेसी….!
अमराठी भाषकांना मराठी ,,,
देवनागरी लिपी व वर्णमाला या विषयावर राज्य शासनाने ६नोव्हेंबर २००९ रोजी अध्यादेश काढला की अमराठी भाषकांना मराठी भाषा अवगत करावी व कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर करावा त्यासाठी अमराठी भाषकांना त्यांचा मराठी भाषेप्रती प्रेम व आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे..
न्याय व्यवहारात मराठीचा वापर….
“कायद्याचे अज्ञान हे बचाव होऊ शकत नाही हे तत्त्व ईतर राष्ट्राप्रमाणे भारतीय कायद्यांचा व न्यायदान पध्दतीचा प्रमुख आधारस्तंभ आहे.ख-या अर्थाने लोकशाही राज्य निर्माण करण्यासाठी सर्व नागरिकांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सर्व आस्थापने ,महामंडळे ,प्राधिकरण ,न्यायाधिकरण ,विभागिय कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी निकालपञे देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितली सर्व कामे मराठी भाषेतुन होणे असे २० आगस्ट ष१९४८ रोजी शासन निर्णय क्र.म.भा.वा.१०८४/प्र-२७१ जारी केले.तरीही “माय लार्ड”हा शब्द कायम आहे,आदरणीय पंडित ,महाशय,महामहिम,आचार्य असे शब्द वापरावेत.,
भाषा संचनालय,,,,
भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद ३४७ अनुसार राष्ट्रपतीना एखाद्या राज्यातील लक्षणिय प्रमाणातील लोकाकडुन बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला अधिकृतरित्या राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतुद आहे.१मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनाची जी महात्वाची धोरणे जाहिर केली त्यापैकी महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठी राहिरल असा ६जुलै १९६० अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना केली त्यात,
१)राजभाषा मराठी विषयक शासनाचे धोरण राबवणे
२)प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शक पुस्तीका तयार करणे,
३)शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधी धोरणांची अंमलबजावणी या दृष्टीने कार्यालयाची तपासणी व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.त्यासाठी १९७९-८० हे राजभाषा वर्षे म्हणून जाहिर केले, तरिही डोक्यावर सोनेरी मुकुट अन् आंगात फाटकेकपडे अशा अवस्थेत मराठी मंञालयाच्या दाराशी उभी आहे अशी खंत कविवर्य कुसुमाग्रजांनी व्यक्त केली…
मराठी भाषेच्या वैभवात भर पडण्यासाठी.
१)पदवी पर्यंत चे शिकवले जाणारे शास्त्रीय व तांत्रिक विषय मातृभाषेतुन “मराठीतुन शिकवण्याचा ऊपक्रम राबवावा…
२)सर्व स्पर्धा परिक्षा मराठी /हिंदी /ईंग्रजी अशी पर्याय असावेत.
३)२१ फेब्रुवारी हा दिवस युनोस्कोने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला .त्याप्रमाणे आपणही सर्व शासकीय कार्यालयात २१ फेब्रुवारी हा दिन “मातृभाषा दिन “म्हणून साजरा करावा.
३)ईंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा बोलण्यावर मर द्यावा..
४)ब्यांकेत ,रेल्वे स्थानकावर दररोज हिंदी शब्द लिहितात त्याचा पर्यायी मराठी शब्द लिहावा..
५) तहसिल कार्यालयातला “तामील”हा असा शब्द वगळून “पालन”हो असा व्हावा म्हणजे आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल.. म्हणुनच..
आमच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी …

 

प्रा. युसूफ मौलासाब शेख.आंबुलगेकर
जिल्हा परिषद प्रा.शा.नवरंगपूरा /बहाद्दरपूरा /कंधार
तथा…राज्य निष्ठा तज्ज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *