समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळावी यासाठी अविरत प्रयत्न करणारे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचा . संवेदनशील कार्यकर्ता म्हणून रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंञी
डॉ .रामदास आठवले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारतीय दलित पँथर सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी ना. रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर यांनी त्यांना धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या सेवा कार्याची विस्तृत माहिती दिली.तेरा वर्षात ७ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणे. रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना २६ महिन्यापासून पहिल्या सोमवारी एकत्रीत करून दाढी कटिंग करून अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देणे. दरवर्षी हिवाळ्यात मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २००० पेक्षा जास्त ब्लॅंकेट चे वाटप गेल्या चार वर्षापासून त्यांच्या मार्फत करणे. पावसाळ्यात कृपाछत्र या उपक्रमां अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारापेक्षा जास्त छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या व्यक्तींसाठी चरण सेवा या उपक्रमा अंतर्गत चप्पला वाटप करण्यात येते.असे वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७८ उपक्रम धर्मभुषण दिलीप ठाकूर हे घेत असल्याचे समजल्यानंतर ना.रामदास आठवले यांनी त्यांचे कौतुक करून सन्मान केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट प्रदेश कार्याध्यक्ष बाबुरावदादा कदम,रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजयदादा सोनवणे,,रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव हे उपस्थित होते.
दिलीप ठाकूर यांच्या कार्याची केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
( छाया: करणसिंह बैस )