धर्मापुरी : ( प्रा.भगवान आमलापुरे ) येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी एल होळंबे यांना पर्यावरणवादी लेखक तथा उपप्राचार्य, संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड,डॉ दयानंद उजळंबे यांनी ” निसर्गद्रस्टी ” हा स्वलिखीत ग्रंथ काल दि ०२ मार्च २३ रोजी सस्नेह भेट दिला.
त्यावेळी रासेयोचे बीड जिल्हा समन्वयक डॉ अमोल गंगणे, भुगोल विभाग प्रमुख प्रा चाटे एस जे आणि प्रा भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती . उपस्थित मान्यवरांना पण यावेळी निसर्गद्रस्टी ग्रंथ भेट देण्यात आला .