डफडे यांनी शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासली- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 

 

कंधार ; गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक पदापासून ते केंद्रप्रमुख पदापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात कर्तव्य एकनिष्ठ राहून मिळालेल्या वेळात बालाजी डफडे यांनी अनेक समाज हिताचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासले असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गौरव सोहळ्यात कंधार येथे बोलताना केले .

 

 

गोलेगाव येथे आयोजित जिल्हा परिषद गोलेगाव संकुलाचे केंद्रप्रमुख बालाजी डफडे यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात अध्यक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते यावेळी शिवा निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे बी टी कदम रामकृष्ण महाराज शिक्षण संस्थेचे सचिव बाबुराव केंद्रे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख चित्र रेखा गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ भुजबळ माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड लोहा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतीश व्यवहारे कंधार पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मोरे माळाकोळी पोलीस निरीक्षक नीलपत्रे माजी तालुका समुपदेशक माधवराव पाटील भालेराव पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे प्राचार्य संजय पवार प्राध्यापक दौलतराव केंद्रे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडितराव पवळे शिक्षक नेते जीवनराव वडजे मुखेड पंचायत समितीचे माजी गटशिक्षणाधिकारी रामभारती प्राचार्य किशनराव डफडे आदींची उपस्थिती होती .

 

 

यावेळी खासदार चिखलीकर म्हणाले की यशाचे खरे  शिल्पकार शिक्षकापासून ते सर्व कर्मचारी अधिकारी आहेत माझ्या प्रत्येक यशात सर्वांचा सिंहाचा वाटा असतो तुम्ही सर्वांच्या आशीर्वादामुळे मला जिल्ह्याच्या जबाबदारी सांभाळावी लागते दररोज कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे लागते तुम्हाला वाटले असेल की डफडे सरांच्या कार्यक्रमासाठी खासदार येतील की नाही परंतु छोट्या छोट्या कार्यक्रमातून मोठा झालेला हा चिखलीकर प्राणी आहे तसेच कपडे परिवाराचे व माझे पारंपारिक संबंध आहेत डफडे परिवारांचे समाजासाठी मोठे योगदान आहे याचीही मला जाण आहे त्यामुळे बालाजीराव डफडे तुम्ही वया मानाने जरी शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी तुम्ही भाजपमध्ये या तुमचे प्रमोशन करीन असे आव्हान चिखलीकर यांनी यावेळी केले .

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आनंदराव गारोळे यांनी केले स्वागत गीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडकर वाढीच्या मुलींनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व हितचिंतक व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती गोलेगाव जिल्हा परिषद संकुलनाच्या वतीने बालाजीराव डफडे यांचा पूर्ण आहेर अंगठी देऊन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी संत ज्ञानेश्वर विद्यालय गोलेगावच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व उपस्थित त्यांचे आभार ग्रामविकास अधिकारी ईश्वर पाटील डफडे यांनी केले .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *