जागतिक श्रवण दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात कानाच्या रुग्णांची तपासनीस प्रतिसाद
कंधार ;आज दिनांक:-०३ मार्च २०२३ रोज शुक्रवार वेळ ठिक:-१०:३० वा वैद्यकीय क्षेत्रातील धनवंतरीच्या प्रतिमेला हार घालून प्रमुख पाहुणे डॉ.दिनकर जायभाये (रूग्ण कल्याण समिती सदस्य ) व गंगाप्रसाद यन्नावार(भाजपा तालुका शहर अध्यक्ष) ,बाळासाहेब पवार(कांग्रेस शहर सचिव) व डॉ.यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर (कान नाक घसा तद्द ) यांनी १५२ कानांच्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्या रुग्णांना मोफत औषध उपचार देण्यात आले .तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू टोम्पे यांना मोलाचे साह्य केले. डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी कानाचे आजार असलेल्या रुग्णांची तपासणी मध्ये ६० महिलांच्या कानाची तपासणी करण्यात आली व ६७ पुरुषाच्या कानांची तपासणी तसेच २५ लहान बालकाच्या कानाची तपासणी करण्यात आले .
एकूण १५२ महिला ,पुरुष लहान बालक यांच्या कानांची प्राथमिक तपासणी करून त्यामधून बहिरेपणा असणाऱ्या रुग्णांना व कानांच्या आवाजाची (Audiometry Test ) क्षमता तपासणी करण्यासाठी ७९ रूग्णांना नांदेड शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे .
जुनाट कानाचे छिद्र होऊन दाह झालेले आजारी असे १५ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे पाठवण्यात आलेले व कॉकलेर इंप्लान्ट चा -०१ ,कानाचा क्ष-किरण करण्यासाठी -०१ रुग्णांना पाठवण्यात आले आहे आणि कानाच्या आतील भागाचा चित्र पाहण्यासाठी ०२ रुग्णांची ( CT Scan) करण्यासाठी पाठवण्यात आले,तसेच नाकाच्या आजाराचा- ०१ करण्यासाठी पाठवण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष पदमवार यांनी केले व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.दत्तात्रय गुडमेवार होते तर ग्रामीण रुग्णालयात आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला .ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांच्या नाविन्यपूर्ण कामाचे कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले डॉ. लोणीकर यांनी शिबीर ठेवण्यामध्ये नियमितता ठेवली व ग्रामीण रुग्णालयाच कायापालट केला त्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित सर्व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले,संतोष पदमवार,दत्तात्रय गुडमेवार,श्रीकांत मोरे,अरुण कुमार राठोड,,गजानन पवार, कर्मचारी श्रीमती. शितल कदम,प्रशांत कुमठेकर, प्रदीप पांचाळ,विष्णुकुमार केंद्रे,आशिष भोळे,अरविंद वाठोरे,निमिषा कांबळे,राजश्री ईनामदार,अश्विनी जाभाडे,अशोक दुरपडे गुंडेराव बोईनवाड ,राहुल गायकवाड आदीनि खूप परिश्रम घेतले.