कंधार ; प्रतिनिधी
हिंदू संस्कृतीमध्ये होळी सणाला व रंगोत्सवाला अन्यन्य साधारन महत्व आहे.कंधार येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सुंदर अक्षर कार्यशाळा हेच धागा पकडून गेल्या सात वर्षापासून छत्रपती शाहू निवासी मतिमंद(गतिमंद) विद्यालय कंधार येथील विद्यार्थ्यांना खोबऱ्याचे हार व पळसाचे फुलं आणि रंग लावुन अनोखा रंगोत्सव साजरा केला. यावेळी एकमेकांना मान्यवरांनी व उपस्थितांनी रंग लावले.
रंगोत्सव २०२३ या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रह्मकुमारी ज्योती बहेणजी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बि एन पितळे,संदर अक्षर कार्यशाळाचे दत्तात्रय एमेकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमीर बेग, मुख्याध्यापक संतोष बदरके, पत्रकार दिगंबर वाघमारे,माधव भालेराव, एस पी केंद्रे,मोहम्मद सिकंदर, ज्ञानेश्वर कागणे ,चंद्रकला बामणे, प्रकाश गोरे, माणिक बोरकर,राजहंस शहापुरे,सौ निलीमा यंबल आदींची उपस्थिती होती उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थित गतिमंद विद्यार्थ्यांना खोबऱ्याचे हार , केळी , अंगूर सह अल्पहार दिला असता गतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्तात्रय एमेकर यांनी करतांना गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सुंदर अक्षर कार्यशाळेच्या संयुक्त विद्यमाने अखंडित उपक्रमामुळे या चिमुकल्या मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्रमंडळी सहकार्य करतात असे सांगत सर्व उपस्थीतांचे आभार मानले,तर ज्योती बहेणजी यांनी धार्मिक महत्त्व विशद केले , होळीचे धार्मिक महत्त्व सांगत रंगाच्या उत्सवातून स्वतः आनंद घेवून दुसऱ्यांना आनंद द्यावे असा संदेश दिला.
यावेळी छत्रपती शाहू मतिमंद विद्यालयाचे पांडुरंग कोंडेवाड,जि.पी पांचाळ,बलभिम राठोड,रजंनाबाई नवघरे,शेख शोहेब, अरविंद रोडगे, धोंडीबा गिरी,पुरी महाराज, तुकाराम बुरफुले, विजयकुमार, बालाजी आयतलवाड अदिंची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार दिगंबर वाघमारे यांनी केले.