अनिष्ट रूढी व प्रथांची होळी करूया ! 6 मार्च होळी, प्रासंगिक लेख

दरवर्षी मानवाने सण आणि उत्सवाच्या माध्यमातून सृष्टीशी, निसर्गशी, ईश्वराशी, आप्तस्वकीयांशी, वीर नायकांशी एक मूल्यात्मक नाते रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
आज ही मानवी संस्कृतीला मूल्यात्मक आधार पुरविण्यासाठी राष्ट्रीय सणाचे आयोजन महत्त्वाचे आहे,

लोकनेत्यांच्या जयंती, पुण्यतिथीला लोकांच्या कल्याणासाठी विधायक उत्सवाने करावयाचे स्मरण, यातून माणसा माणसात सलोख्याचे, एकात्मतेचे ,नाते वाढायला लागते, म्हणून होळी या सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक महत्त्व या लेखातून स्पष्ट करीत आहोत त्यासाठीच हा लेखन प्रपंच……….
दरवर्षी मार्च महिना हा परीक्षा, होळी, रंगपंचमीचा असतो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार होळी हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येत असतो, यावर्षी ६ मार्चला होळी व 7 मार्चला धुलिवंदन म्हणजेच *धूळवड* आहे. हे दोन सण पूर्वीपासूनच फार उत्साहाने साजरी केले जातात. पहिल्या दिवशी पुरणपोळीचा मनमुराद आस्वाद घेतला जातो, तर दुसऱ्या दिवशी धुळवड करून एकमेकांच्या अंगावर रंग टाकून आनंद घेता येतो, म्हणून हे दोन दिवस अतिशय आनंदाचे व महत्त्वाचे आहेत.
*होली के दिन, दिल खिल जाते है*…
*रंगो मे रंग, मिल जाते है*..
*गीले शिकवे, भूल के दोस्तो*….
*दुश्मन भी गले लग जाते है*..
असे म्हणून मनातील राग बाजूला सारून होळी साजरी करावी.
उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी हा सण श्रीकृष्णाने पुतना मावशीचा वध करून दुष्ट प्रवृत्तीवर बोंबाबोंब मारून नष्ट केला जातो, त्याचे प्रतिक म्हणून कृष्णपूजा करतात. ग्रामीण भागात, चौकामध्ये, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लाकडे आणि गव-या आणून होळी पेटविण्यात येते .त्यावेळी होलिका देवीची पूजा करून होळी पेटवतात. हिरण्यकशिपू व भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगितली जाते.

 

 

भक्त प्रल्हाद हा सत्यवादी होता व होलीका ही दृष्टविचारी होती हे त्या कथेतून कथन केले जाते ,तिच्या दर्शनासाठी आबालवृद्ध, सुवासिनी महिला, छोटे मुलं- मुली पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन तेथे गर्दी करतात. आणि होळीला नैवेद्य अर्पण करून जीवना तील अशुभ, अमंगल आणि दुष्ट प्रवृत्तीची राख रांगोळी व्हावी ,अशी लोक भावना होळी सणाच्या निमित्ताने आचरणारातून स्पष्ट होते .
एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन बोंब मारली जाते *लाईटच्या खांबाला नाही गोळा,….ला नाही डोळा . टोपलं पडलं उभडं, गावात…………कुबडं
मराठी भाषेतील अस्सल शिवी देऊन या दिवशी एकमेकांसमोर जाऊन होळी पेटवली जाते आणि त्याचा आनंद घेतला जातो .
तसेच होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवळ खेळण्यासाठी आणि मौजमजा सर्वांसोबत करण्यासाठी असतो या दिवशी स्त्री-पुरुष छोटे-मोठे गट करून हातात रंगाच्या पिचकारी घेऊन इतरांच्या अंगावर त्या उडवत, हिंडत ,फिरत, खेळत असतात.
काही ठिकाणी रंगाचे हौद तयार करून हौदात रंग टाकून एकमेकांच्या अंगावर उडवायला सुरुवात करतात. पूर्वीच्या काळी होळीला पळसाच्या फुलांचा रंग तयार करून तो लावला जात असे, पळसाच्या पानाचा व फुलांचा आरोग्या साठी उपयोग होतो ,त्यामुळे त्वचा चांगली राहते असे आयुर्वेद सांगते, उत्तर भारतात मथुरा ,वृदांवन सारख्या वैष्णव सांप्रदायी तीर्थक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कृष्णाने रंगोत्सव साजरा केला असे पौराणिक दाखले दिले जातात. महाराष्ट्रात होळीच्या नंतर पाच दिवसाला रंगपंचमी खेळली जाते
त्यामुळे ग्रामीण व शहरी भागामध्ये या निमित्ताने मौजमजा केली जाते. एकूणच अर्वाच्य भाषेत बोलणे. अनिर्बंध वागणे या दिवशी पूर्ण मोकळीक असते. शिष्टाचार काही काळ गुंडाळून मुक्तपणे वागवून पुन्हा नव्या उमेदीने शिष्टाचार युक्त जीवनाला आणि चांगल्या वर्तणुकीला सामोरे जावे लागते, होळी हा रंगाचा सण आहे मनातील राग होळीच्या दिवशी जोरजोराने ओरडून मनातून बाहेर काढून टाकावा, एखाद्याच्या नावाने शिमगा करण्याची प्रथा फार पूर्वीपासून या सणात आहे. होली का उत्सव होळी होली, शिमगा असे अनेक पर्यायी शब्द या होळीला सणाला आहेत. चित्रपटातूनही होळी दाखवली जाते व आनंद लुटला जातो, आता परिस्थिती बदलली, प्रत्येक जाती- धर्माचे सण साजरे करण्याचे तंत्र बदलले ,
त्याला राजकीय स्वरूप आले ,
त्यामुळे मनातील वाईट विचार होळीच्या दिवशीअग्नीत टाकावे,
हाच होळी साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे, वाईटावर चांगल्यांचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते, म्हणून लाडा -लाडाने होळी साजरी करत असताना,
*खेळताना रंग बाई होळीचा* *फाटला ग कोना माझ्या चोळीचा* हे लोकप्रिय गीत सर्वत्र म्हटले जाते, सध्याच्या काळात पाणीटंचाई आहे, पाण्याची जास्त नासाडी न करता समजूतदारपणाने होळी साजरी करावी, कसल्या ही प्रकारचा कृत्रिम रंग तोंडाला लावू नये, त्यामुळे डोळे, कान ,चेहरा खराब होऊ शकतो ,
म्हणून सावधानतेने होळी साजरी करावी आणि म्हणावे
*बुरा न मानो होली है*!!

 

 

*

शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *