फुलवळ;(धोंडीबा बोरगावे)
कंधार तालुक्यातील आंबूलगा ( गऊळ ) ता.कंधार , जि. नांदेड येथील जेष्ठ नागरिक गंगाबाई बापूराव पा. तेलंग वय ९६ यांचं ता. ७ मार्च रोज मंगळवारी दुपारी अल्पशा आजारात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर ता. ८ मार्च रोज बुधवारी सकाळी ११ वाजता आंबूलगा (गऊळ ) ता.कंधार येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी , नातेवाईकासह मित्रमंडळी व राजकीय , शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , माजी खासदार डी.बी. पाटील , माजी मंत्री डी.पी. सावंत , माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर , माजी आमदार रोहिदासराव चव्हाण , माजी आमदार नारायणराव पाटील म्हैसेकर , सिनेअभिनेते तथा सेवानिवृत्त आयुक्त एकनाथ ऊर्फ अनिल मोरे , लातूर शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुधाकर पाटील तेलंग , संजय बेळगे , संभाजीराव केंद्रे , ऍड विजयकुमार धोंडगे , बालाजी कोंपलवार , संजय भोसीकर , बळवंतराव बेटमोगरेकर , रंगनाथ भुजबळ , बालजीराव पांडागळे , शरद पवार , केशवराव चव्हाण , आनंदराव चव्हाण , स्वप्निल पाटील उमरेकर , साहित्यिक शिवाजीराव आंबूलगेकर सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शोकाकुल वातावरणात मनोगतातून श्रद्धांजलीपर शोक व्यक्त केला तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पण आपला शोक संदेश पाठवला तो त्याचे एकनाथ मोरे यांनी वाचन केले.
त्या माजी जि. प. सदस्य मनोहर पा. तेलंग, भाजपा चे डॉ. श्याम पा. तेलंग, सेवानिवृत्त डी.एफ.ओ. मधुकर पा. तेलंग आणि पणन आय. ए. एस. अधिकारी सुधाकर पा. तेलंग यांच्या मातोश्री तर माजी जि. प. सदस्य बाबुराव पा. गिरे यांच्या आजी होत.
त्यांच्या पश्चात पती बापूराव पाटील तेलंग , चार मुले, दोन मुली, सुना ,जावई , नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.
विशेष बाब म्हणजे स्वर्गीय गंगाबाई तेलंग यांच्या दोन पणती नामे सिद्धी सुरेश तेलंग व रितिका राजेश तेलंग या दोघीही इयत्ता बारावी विज्ञान वर्गात शिकत असल्याने त्यांच्या बारावीच्या सध्या परीक्षा चालू असताना आपल्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतांना आज सकाळी आपल्या मयत आजीचे अंत्यदर्शन घेऊन या दोन्ही पणती बारावीचा जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी पेपर दिला. त्यांनी हे दुःख पचवत परीक्षेसाठी लावलेली हजेरी पाहून सर्वत्र त्यांचीच जोरदार चर्चा ऐकायला मिळत होती आणि विशेषतः आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन असल्याने या विशेष दिनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक ही होत असून या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा इतरांनी आदर्श घेतला पाहिजे अशा भावना ही अनेकांकडून ऐकायला मिळत होत्या.