कंधार ; प्रतिनिधी
राजमाता मॉ साहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागानेच आजच्या महिलांची प्रगती सर्वच क्षेत्रात झाली असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे , केवळ महीला दिनीच महिलांचा सन्मान न करता तिला वेळोवेळी यशाचे शिखर पार करण्यासाठी पुरुषांनी सहकार्य करावे असे नांदेड जिल्हा महिला कॉग्रेस उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर यांनी महिला दिनी कंधार येथे प्रतिपादन केले .
८ मार्च जागतील महिला दिनानिमित्त प्रियदर्शनी उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथे साजरा करण्यात आला . सर्वप्रथम राजमाता मॉ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले .
नंतर महिलांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी सौ शिवकांताबाई मंगनाळे, प्राचार्या सौ.राजश्री शिंदे,सौ.राधाताई भोसीकर, यावेळी उपस्थित विद्यालयातील शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते .