कंधार ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा व कायाकल्प पुरस्कार ; वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर  यांच्या वतिने महिलांचा झाला सन्मान

कंधार ; प्रतिनिधी

आज दिनांक ०८/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर स यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक महिला दिनाची सुरुवात प्रमुख पाहुणे शरद मंडलिक साहे (उपविभागीय अधिकारी, कंधार), अनुपसिह यादव  यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.डॉ.सुर्यकांत लोणीकर,शरद मंडलिक साहेब (उपविभागीय अधिकारी, कंधार),अनुपसिह यादव (तहसीलदार कंधार),ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई माता रमाई ,फ्लूरन्स निटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आले.

 

तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले यांनी सर्व महिला वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय कंधार येथे नुकतेच रुजू झालेले (NCD) वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे साहेब (MD Medicine) यांचे स्वागत डॉ.राजू टोम्पे यांच्या हस्ते शाल पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.कायाकल्प कार्यक्रम मध्ये उत्कृष्ट काम केलेले कर्मचारी श्रीमती.शितल कदम, व कार्यक्रम प्रमुख राजश्री इनामदार, शिल्पा केळकर,मयुरी रासवंते,अश्विनी जाभाडे,अनिता तेलंगे,ज्योती तेलंग,पल्लवी सोनकांबळे,प्रशांत कुमठेकर,विष्णुकुमार केंद्रे,यांचा सन्मान फेटा, पुष्पहार ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर यांनी आपल्या वैयक्तीक खर्चातून वर्ग चारच्या ११ कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे कार्य चांगल्या प्रकारे पार केल्याबद्दल त्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले व तसेच सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन व कर्मचारी अनुक्रमे ,श्रीहरी कागणे,अशोक दुरपडे,मुंढे हणमंत,रमेश मुंढे,बालाजी जाधव ,सुनीता जेलेवाड,राहुल गायकवाड,अमोल बगाडे,नरसाबाई नांगलवाड,सत्वशीला कांबळे,यांचा सत्कार करण्यात आला .

 

 

जागतिक महिला दिनी शरद मंडलिक साहेब ,व अनुपसिह यादव साहेबानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,नियमित प्रोत्साहन पर कार्यक्रम घेतले जातात, रुग्णालयीन कामे उत्कृष्ट होत आहेत, व डॉ.सुर्यकांत लोणीकर साहेबाच्या कामाचे व्यवस्थापन बाबत कौतुक केले …
डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्त्री ही जोपर्यंत एकमेकांचा सन्मान करणार नाही तो पर्यंत स्त्रियाचा खरा सन्मान म्हणता येणार नाही, पुढे म्हणाले की स्त्री ही देशाची पंतप्रधान होऊ शकते,राष्ट्रपती बनू शकते, अणि ती कुटुंबांसाठी वरदान ठरते आहे, यामुळे अनेक कुटुंबांची दररोजची थाळी चौरस आहाराने सजते आहे स्त्रीचा नजरेतून सन्मान झाला पाहिजे,समाजात त्यांचे कडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, त्यामुळे राज्य महिला आयोग – राज्यातील पीडित महिलांना आपल्या तक्रारी इत्यादी प्रकरणात जलद न्याय मिळणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
तसेच डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे की असेच कार्यक्रमाचे बक्षिस मिळत राहावे कायाकल्प अंतर्गत १५ लाख रुपयांचे राज्यस्तरीय बक्षीस मिळावे सदर हा कार्यक्रम पुढच्या वर्षी पण घेण्यात यावा असे आव्हान कर्मचाऱ्यांना करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुमठेकर व मयुरी रासवंते यांनी केले आहे.
श्रीमती.राजश्री ईनामदार यांनी राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रम कसा राबविला व एक लाखाचे बक्षीस संस्थेला खूप मोठ्या श्रमाने मिळाला..याबद्दल सांगितले.
यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले डॉ.संतोष पदमवार डॉ.श्रीकांत मोरे, डॉ. शाहीन बेगम ,डॉ.गजानन पवार,
डॉ.उजमा तबसुम,
डॉ. अरुणकुमार राठोड,
डॉ. नम्रता ढोणे,
डॉ. दत्तात्रय गुडमेवार ,
डॉ.निखहत फातेमा ,व कर्मचारी श्री.ज्ञानेश्वर बगाडे
(सहाय्यक अधीक्षक) ,सुनीता वाघमारे, मनीषा वाघमारे,आऊबाई भुरके, (अधिपरिचारिका), प्रियंका गलांडे ,सुरेखा मैलारे,
औषध निर्माण अधिकारी श्री.दिलीप कांबळे,श्री.लक्ष्मण घोरपडे ,श्री.आशिष भोळे ,श्री.अरविंद वाठोरे,
श्री.कोंडाआप्पा स्वामी ,
श्री.सचिन ठाकूर
(प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
श्री विठ्ठल धोंडगे (एक्स-रे टेक्निशियन)
श्री.राजेंद्र वाघमारे,( समुपदेशक),
श्री. प्रदीप पांचाळ(ICTC),श्री. संतोष आढाव.
चालक श्री.अशोक दुरपडे,
श्री.गुंडेराव बोईनवाड,
श्री.भीमाप्पा हमप्पले, युसुफ सय्यद,
श्री.संभाजी मोकले
याप्रसंगी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला यशस्वी केला विष्णुकुमार केंद्रे यांनी आभार मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *