नांदेड : माहूर येथील आनंद दत्त धामचे प्रमुख तथा राष्ट्रंत साईनाथ महाराज हे गुढी पाडव्यापासून दि. २२ मार्च भारत-पाक सीमेवारील अट्टारी, वाघा बॉर्डर येथे आपल्या सुमारे दीड हजार भक्तांसोबत अखंड दत्तनाम सप्ताह करणार आहत. भारत-पाक सीमेवर अशा प्रकारचा सप्ताह होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आनंद दत्त धामचे प्रमुख तथा राष्ट्रंत साईनाथ महाराज आणि विश्वस्त बबनराव जगाडे यांनी आज पत्रकार परिषदेत सयुंक्त माहिती दिली.
हातात झाडू आणि काखेत झोळी असलेले साईनाथ महाराज हे २००६ पासून आनंद दत्त धामचे प्रमुख म्हणून कार्यरत आहत. स्वच्छता अभियान, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन आणि जिवाचा उद्धार या सप्तसूत्रीनुसार ते काम करत आहेत…
सामाजिक व धार्मिक कार्यासोबत देशातील काम करणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेवून थेट भारत-पाक सीमेवर अट्टारी, वाघा बॉर्डर येथे वाल्मिकी आश्रम या ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताह प्रवचन असा कार्यक्रम साईनाथ महाराज हे करणार आहेत. देश के लिए सात दिन हा त्यांचा हेतू आहे. सीमेवरील या सप्ताहसाठी नांदेड येथून दि. १९ मार्च रोजी साईनाथ महाराज व त्यांचे असंख्य अमृतसर एक्सप्रेसने वाघा बॉर्डरकडे रवाना होणार आहेत, असे जगाड़े यांनी सांगितले.
माहूर, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, जालना येथून तसेच आंधातून मिळून सुमारे दीड हजार भक्त या सप्ताहात भाग घेणार आहेत. हे सर्व लोक नांदेड येथून दि. १९ पासून टप्या टप्प्याने खाना होणार आहेत. देशभक्तीसाठी आणि शहिदांच्या श्रद्धांजलीसाठी देशाच्या सीमेवर होणारा हा पहिलाच सप्ताह आहे, असे जगाडे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ. अमर राजूरकर, यांनी प्रोत्साहन देवून सहकार्य केले आहे. अन्य राजकीय नेत्यांनी देखील सहकार्य केले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रसिद्ध उद्योजक रमेश पारसेवार, विश्वनाथ घनकोट , बबनराव जगाडे, आनंदराव गंदिलवार, शिवाजी पाटील चींचाळकर, विलास पाटील शिंदे, राम तूप्तेवार आदींची उपस्थिती होती.